Saturday, 5 November 2022

महामार्गावरिल दुभाजके तोडुन ग्राहकांना जाणे – येणे करिता रस्ता तयार करून शासकीय मालमत्तेचे नुकसान करणा-या १५ व्यवसाईकांवर गुन्हे दाखल !

महामार्गावरिल दुभाजके तोडुन ग्राहकांना जाणे – येणे करिता रस्ता तयार करून शासकीय मालमत्तेचे नुकसान करणा-या १५ व्यवसाईकांवर गुन्हे दाखल !


औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ०५ : औरंगाबाद ग्रामीण जिल्हयातुन जाणारे महामार्गावरिल दोन लेन मधील दुभाजके तोडुन शासकीय मालमत्तेचे नुकसान करून कृत्रिम वळण रस्ता तयार केल्याने वाहनचालक या कृत्रिम वळणातुन अचानक वळण घेतल्याने अपघात होण्याची दाट शक्यता असते. अशा प्रकारे महामार्गावरिल स्वत:चे आस्थापनाकडे ग्राहकांना सहजतेने येणे- जाणे शक्य होईल याकरिता महामार्गालगत असलेले काहि व्यवसाईक हे अनाधिकृतपणे लेनच्या मध्ये असलेले दुभाजक तोडतात यामुळे महामार्गावर अपघात होण्याची शक्यता मोठया प्रमाणावर वाढते.

मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांनी अशा प्रकारे महामार्गावरिल लेन मधील दुभाजक तोडुन रस्ता बनविणा-या व्यवसाईकांची गंभीर दखल घेऊन महामार्ग व्यवस्थापन अधिका-याचे माध्यमांतून गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे. ज्यामुळे महामार्गावर होणारे अपघातांना वेळीच प्रतिबंध घालता येईल.
 
मा. पोलीस अधीक्षक यांचे सुचना नुसार आतापर्यंत जिल्हयातील कन्नड ग्रामीण, खुलताबाद, पाचोड, गंगापुर, करमाड, या पोलीस ठाणे अंतर्गत १५ आस्थापनेच्या मालक ज्यामध्ये हॉटेल व्यवसाईक, पेट्रोलपंप चालक, फॉर्म हाऊस मालक, वॉशिंग सेटर मालक, इत्यादी असुन त्यांचे विरुध्द कलम 431 भादंवी सहकलम 3 सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम- 1984 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये पाच वर्षापर्यंत कारावासासह आर्थिक दंडाची शिक्षा प्रस्तावित आहे. 

१) पोलीस ठाणे कन्नड ग्रामीण यांनी पुढील हॉटेल मालका विरूध्द गुन्हे दाखल केले आहेत ज्यात - 1) हॉटेल मावली 2) हॉटेल शिवराज 3) हॉटेल अशोक 4) हॉटेल आबाचा वाडा 5) हॉटेल श्रीमुर्ती 6) गर्जे फार्म हाऊस 7) हादगाव वॉशिंग सेंटर सर्व कन्नड हायवे वरिल आहेत.

 २) पोलीस ठाणे खुलताबाद : - कसबाखेडा ते पळसवाडी या महामार्गावरिल 1) हॉटेल आम्रपाली 2) हॉटेल रोहीणी मालका विरूध्द.

 ३) पोलीस ठाणे गंगापुर - 1) हॉटेल बटर फलाय (जुने कायगाव) 2) हॉटेल लोकसेवक 3) गांधी पेट्रोल पंप 4) हॉटेल जिजावु 5) गॅनोज कंपनी 6) एच.पी. पेट्रोलपंप 7) हॉटेल इंडियन ढाबा 7) ग्रामपंचायत, ढोरेगाव

 ४) पो.स्टे पाचोड :- आडुळ बायपास जवळ माऊली लॉन्स समोर रजापुर, डाभरुळ गावा जवळ अज्ञात व्यक्तीविरोध्दात.

 ५) पो.स्टे. करमाड :- औरंगाबाद ते जालना रोडवर करमाड गावाजवळील रोडवरील दुभाजक अज्ञात व्यक्ती विरूध्द.

 मा. पोलीस अधीक्षक यांनी आवाहन केले आहे कि, महामार्गालगत असलेल्या व्यवसाईकांनी स्वत:चे फायद्यासाठी दोन लेन मधील दुभाजक तोडुन शासकिय मालमत्तेचे नुकसान करून कृत्रिम वळण रस्ता बनवुन नये. ज्यामुळे असे तोडलेले दुभाजक हे महामार्गावर अपघात होण्यास कारणीभुत ठरतील महामार्ग नियमांचे सर्वांनी पालन करावे.

या नियमांचे जाणीवपुर्वक उल्लघंन करणा-या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्था यांची गय केली जाणार नाही त्यांचे विरूध्द कडक कारवाई करण्यात येवुन अशा व्यक्ती अथवा संस्था यांचे विरूध्द तात्काळ कलम 431 भादंवी सहकलम 3 सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम- 1984 अन्वये कायद्यातील तरतूदी प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येईल.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...