जव्हार, जितेंद्र मोरघा :
नुकतीच झालेल्या दुर्दैवी घटनेत शहापूर तालुक्यातील आदिवासी समाजाचा प्रसिद्ध गायक कै. बालम रतन दिवे याचा मासे मारी करताना जीव गमावला होता.
सोशल मीडिया वरील त्यांची गाणी खूप होती, त्यांचे पोरी तु सपनात हे गाणे तुफान गाजले होते.
अशा या गायक कवीच्या मृत्यू नंतर त्याच्या कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे, हि बातमी समजताच आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे 'अध्यक्ष प्रदीप वाघ' व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कुटुंबाला आर्थिक व किराणा सामान देऊन मदत केली व सांत्वन केले.
यावेळी मंगेश दाते कार्याध्यक्ष, गणेश वाघ पत्रकार, विठ्ठल गोडे पोलिस पाटील, नंदकुमार वाघ उपसरपंच, अनंता वारे ग्रामपंचायत सदस्य, चुनीलाल पवार सर, राम फसाळे, सागर वराटे, अशोक वाघ, संजय वाघ, रमेश बोटे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment