Sunday, 25 December 2022

मुरबाडच्या विकासात बांबूच्या काढ्यांचा भकास, कल्याण मुरबाड मार्गावरील धानिवली पुलावर धक्कादायक प्रकार !

मुरबाडच्या विकासात बांबूच्या काढ्यांचा भकास, कल्याण मुरबाड मार्गावरील धानिवली पुलावर धक्कादायक प्रकार !

कल्याण, (संजय कांबळे) : मुरबाड विधानसभा मतदार संघाचे आमदार किसन कथोरे यांच्या विकास कामामुळे त्यांना कार्यसम्राट आमदार, विकास पुरुष, विकासाचे वादळ असे म्हटले जाते, व ते खरेही आहे, परंतु त्यांच्याच मतदारसंघात धानिवली येथील पुलावर संरक्षक कटडे तुटल्याने त्याच्या जागी चक्क बांबुच्या काढ्या उभ्या केल्याने याला याला दुर्लक्ष म्हणावे की अजून काही? मात्र या धक्कादायक प्रकारामुळे कल्याण मुरबाड येणाऱ्या जाणाऱ्या ना अपघाताचे निमंत्रण ठरु शकते.

कल्याण मुरबाड नगर हा राष्ट्रीय महामार्ग आहे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची येजा सुरू असते, तसे पाहिले तर गोवेली पासून पुढे हा मार्ग सुसाट आहे, मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी आपल्या मतदारसंघातील बहुतांश मुख्य, तसेच गावोगावचे रस्ते सिमेंटचे केले आहेत. काही ठिकाणी अपवादात्मक रस्ते राहिले असतील, तरीही त्यांच्या विकास कामाला जोड नाही हेही तितकेच खरे आहे, त्यामुळेच त्यांना विकास पुरुष, किंवा विकासाचे वादळ म्हटले जाते. प्रशासनावर मजबूत पक्कड असणारे ते आमदार आहेत, परंतु त्यांच्या मतदारसंघात संघात येते असलेल्या धानिवली येथील कल्याण मुरबाड मार्गावरील मुरबाडी पुलाचे संरक्षक कटडे, कोसळले ले आहेत, दोन्ही बाजूला ही परिस्थिती आहे. वास्तविक पाहता या रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक बघता या जागी किमान तात्पुरती का होईना संरक्षक भिंत, किंवा इतर पर्याय उभा करायला हवा होता. पण दुर्दैवाने ते केलेले दिसत नाही, उलट येथे बांबूच्या काढ्या दोन्ही बाजूला उभ्या करून नँशनल हायवे अँथोरटी ने आपले दारिद्रय दाखवले आहे. दोन्ही बाजूंना वळणावर हया काढ्या असल्याने वाहनांना अपघात झाला तर ते डायरेक्ट नदीच्या पात्रात कोसळू शकतात, या ठिकाणी धोका दर्शवणारा कोणताही दिशादर्शक नाही.

काही दिवसांपूर्वी केंद्रिय राज्य मंत्री पंचायत राज कपिल पाटील यांनी माळशेज घाटातील सावर्णे येथे कल्याण माळशेज अहमदनगर निर्मल राष्ट्रीय महामार्ग दुहेरी काँक्रीटीकरण विकासकामांचे भूमिपूजन केले होते, कदाचित धानिवली येथील या पुलाचा देखील त्यामध्ये समावेश असू शकतो, याला कित्येक वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे आता या धोकादायक पुलावर संरक्षणासाठी काही उपाययोजना करायला नको का? सध्या सर्वत्र अपघाताचे प्रमाण भयानक वाढले आहे. अशातच पुढील महिन्यात प्रसिद्ध म्हसोबा यात्रेला सुरुवात होणार आहे. यासाठी संपूर्ण राज्यभरातून लोक येत असतात, अशावेळी हे या बांबूच्या काढ्यामुळे या भागातील लोकप्रतिनिधी, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते, जागृत नागरिक यांच्यासाठी हे भूषणावह नाही. त्यामुळे याचा गंभीरपणे विचार शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी यांनी करायला हवा? की कोणत्या मोठ्या अपघाताची वाट पाहतोय  का हे तरी नँशनल हायवे अँथोरटी ने सांगावे !

प्रतिक्रिया -

* किसन कथोरे (आमदार, मुरबाड विधानसभा)
मी या संदर्भात वारंवार नँशन हायवे अँथोरटी यांना पत्रव्यवहार केला आहे, हा राज्याचा विषय असता तर कधीच केला असता, पण हे दुर्दैव आहे.

*प्रविण भोईर (सामाजिक कार्यकर्ते, कल्याण)
जनतेच्या सुखदुःखाशी राज्यकर्ते, कार्यकर्ते, प्रशासन यांना कोणालाही काही देणे घेणे नाही, हे सर्व काही घटना घडल्या वर गळा काढतात बस्स !

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...