मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे औरंगाबाद विमानतळावर जोरदार स्वागत !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २५ : मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांचे औरंगाबाद विमानतळावर आज सकाळी आगमन झाले. यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया उपस्थित होते.
No comments:
Post a Comment