Saturday, 24 December 2022

केन्द्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यात सखोल चर्चा !

केन्द्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यात सखोल चर्चा ! 

जालना/ भोकरदन, अखलाख देशमुख, दि २४ : *जालना - जळगाव रेल्वेमार्गाच्या कामाला गती देण्यासह केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पा. दानवे आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यात सखोल चर्चा झाली.* 
    
          मंत्री रावसाहेब दानवे यांना सिल्लोड महोत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार मंत्री दानवे यांच्या भोकरदन येथील निवासस्थानी आले होते. यावेळी मंत्री दानवे व मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात  सिल्लोड - सोयगाव मतदारसंघासह जालना - औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या संदर्भात सखोल चर्चा झाली.

         यावेळी आमदार संतोष दानवे,  सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, सिल्लोड न.प.तील गटनेते नंदकिशोर सहारे, डॉ. मच्छिन्द्र पाखरे, सतीश ताठे, सयाजी वाघ,भूषण शर्मा, शेख नजीर आदींची उपस्थिती होती.

       जालना - जळगाव रेल्वे मार्गाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करू असे कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. तर केंद्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठी आर्थिक तरतूद करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

       मराठवाडा - विदर्भातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी पोखरा योजना टप्पा 2 राबविण्यात येणार असून यात अनेक गावांचा समावेश करण्यात येणार असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.  एकूणच दोन्ही मंत्र्यात केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा झाली.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...