Saturday, 24 December 2022

सिल्लोड महोत्सवाची क्रिकेट सामन्यांनी सुरवात.. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नाणेफेक !

सिल्लोड महोत्सवाची क्रिकेट सामन्यांनी सुरवात.. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नाणेफेक ! 

औरंगाबाद/ सिल्लोड, अखलाख देशमुख, दि २४ : सिल्लोड महोत्सव 2023 अंतर्गत शहरात सुरू असलेल्या SML क्रिकेट सामन्यांना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवार रोजी सायंकाळी भेट दिली. याप्रसंगी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते नाणेफेक करून सामन्यांना सुरुवात करण्यात आले. मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या. 

या क्रिकेट सामन्यात राज्यभरातून संघ सहभागी झाले असून हे सामने पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती पहायला मिळत आहे. येत्या 1 जानेवारी रोजी येथे अंतिम सामने होणार आहेत. 

यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, सिल्लोड न.प. तील बाळासाहेबांची शिवसेनेचे गटनेते नंदकिशोर सहारे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, विशाल जाधव, सतीश ताठे, व्यापारी महासंघाचे दुर्गेश जैस्वाल, भिकचंद कर्णावट, हाजी शेख मसर्रत, अमृत पटेल, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, रईस मुजावर, प्रशांत क्षीरसागर, अकिल वसईकर, मनोज झंवर, चांद बेग मिर्झा, राजू गौर, शेख सलीम हुसेन, सत्तार हुसेन, मतीन देशमुख, बबलू पठाण यांच्यासह अकिल देशमुख, संग्राम लखवाल, फहिम पठाण,  दीपक घरमोडे, शेख इकबाल, आरेफ पठाण, फारूक पठाण, इक्राम शेख, अलिम पठाण, नजर पठाण, शेख रईस, शेख अहेमद आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...