Saturday, 3 December 2022

*निती आयोग मार्फत “अटल इनोव्हेशन मिशन” अंतर्गत जे.ई.स्कूल व ज्यू.कॉलेज एमसीव्हीसी मुक्ताईनगर ला मिळालेल्या “अटल टिंकरींग लॅब” चे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्घाटन...*

*निती आयोग मार्फत “अटल इनोव्हेशन मिशन” अंतर्गत जे.ई.स्कूल व ज्यू.कॉलेज एमसीव्हीसी मुक्ताईनगर ला मिळालेल्या “अटल टिंकरींग लॅब” चे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्घाटन...*  

जळगाव/मुक्ताईनगर, अखलाख देशमुख, दि ३ : निती आयोग, दिल्ली मार्फत “अटल इनोव्हेशन मिशन (एआईएम)” या केंद्र सरकारच्या महत्वाकांशी योजने अंतर्गत जे.ई.स्कूल व ज्यू.कॉलेज, मुक्ताईनगर च्या एमसीव्हीसी विभागासाठी मंजूर करण्यात आलेल्या “अटल टिंकरींग लॅब” चे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. 

भारतातील एक दशलक्ष मुलांना निओटेरिक इनोव्हेटर्स म्हणून विकसित करणे या संकल्पनेसह, *“अटल इनोव्हेशन मिशन”* अंतर्गत देशभरातली शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅबोरेटरीज स्थापन करत असून. या योजनेचा उद्देश तरुणांच्या मनात कुतूहल, सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती वाढवणे असून, रचनात्मक मानसिकता, संगणकीय विचार, अनुकूल शिक्षण, भौतिक संगणन इत्यादी सारखी कौशल्ये विकसित करण्याचा आहे. अशी यावेळी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी उपस्थित विद्यार्थी मित्रांना माहिती देऊन मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. 

यावेळी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांच्यासह डॉ.सी.एस.चौधरी,मारुती बढे, रमेश खाचणे,आर.पी.बऱ्हाटे सर,महेश पाटील, प्राचार्य आर.पी.पाटील सर, एच.ए.महाजन, एन.पी,भोंबे.व्ही.एम.लोंढे, आर.आर.राणे,जे.जे.पाटील, एस.आर.महाजन, व्ही.डी.पाटील,एस.पी.राठोड,सी.डी.पाटील, व्ही.एम.चौधरी, एस.आर.ठाकूर,अजय खुळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...