कल्याण, (संजय कांबळे) : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून आज कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात पंचायत समिती दिव्यांग कर्मचा-यांचे संवेदना शिबिर आयोजित केले होते. असे आयोजन पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच होत असून यावेळी एका दिव्यांग कर्मचारी मातेने कलेले मन मोकळे, अनुभव, प्रंसग सांगताना तिच्या अश्रूंचा बांध फुटला ,या प्रंसगामुळे संपूर्ण सभागृह गहिवरून गेले, तर आजच्या या दिनाचे सार्थक झाले अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
आज ३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून ओळखला, कल्याण पंचायत समितीच्या प्रशासनात अनेक कर्मचारी हे दिव्यांग आहेत, त्यामुळे त्यांच्या साठी काहीतरी वेगळे करावे या उद्दात हेतेने केवळ एका दिवसात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आजचा हा दिवस संवेदना शिबीर म्हणून साजरे केले. यामध्ये प्रथम कल्याण पंचायत समितीच्या सभापती अस्मिता अजय जाधव यांनी भारताचे माजी राष्ट्रपती, कृषीमंत्री कै राजेंद्र प्रसाद यांच्या जंयतीनिमित्त पुष्पहार अर्पण केला.
यानंतर कु संस्कृती घरत, तृतीया मिस्त्री आणि शमीका देशमुख यांनी देशभक्ती पर गीत व डांन्स सादर करून कार्यक्रमात रंगत भरली, कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, आजचा जागतिक दिव्यांग दिन हा संवेदना शिबीर म्हणजे साजरे करतोय, यामागे चांगला हेतू आहे, दिव्यांगाचे विविध प्रकार आहेत, शारीरिक, बौद्धिक, अनुवांशिक आणि मानसिक, यामध्ये मानसिक सर्वात धोकादायक ठरू शकते, कारण दिव्यांगामध्ये मोठा आत्मविश्वास असतो, मात्र मनच अपंग असेलतर अवघड परिस्थिती निर्माण होते.असे सांगून अशा कर्मचाऱ्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेऊन त्या तात्काळ सोडविण्यासाठी संबंधीत विभागाच्या प्रमुखांना सूचना केल्या.
यावेळी नगरहून आलेले खास येथील कर्मचाऱ्यांना उर्जा व प्रोत्साहन मिळावे यासाठी उपस्थित असलेले केशव भांगरे हे म्हणाले, मी स्वतःला कधी दिव्यांग समजत नाही, मी लहान असताना मला अंपगत्वामुळे शैक्षणिक सहलीला नेले नाही, तेव्हा पासून ठरवलं की, राज्यातील एकही किल्ला सोडायचा नाही, त्यांनी आतापर्यंत सुमारे ९१ किल्ले, रँपलिंग व ट्रकिंग करून सर केले आहेत, लवकरच आपली नोंद गिनिजबुक आँफ रेकॉर्ड मध्ये होणार असल्याचे सांगितले.
तर यावेळी दिव्यांगाचे अनुभव, येणाऱ्या अडचणी, समस्या, प्रश्न यावर बोलताना, श्रीमती साळवी या स्वतः दिव्यांग असून त्यांचा मुलगा देखील दिव्यांग आहे ते सांगतात त्या म्हणाल्या, मला अजिबात कमी पणा वाटत नाही, कारण मी मनाने मुळीच अपंग नाही, समाजाकडून आम्हांला सहानुभूती नको आहे, संधी हवी आहे. आम्ही जिद्दी असतो कारण आपल्याला इतरापेक्षा वेगळे समजले जाते,एकूण जीवनातील व आयुष्यातील आलेले प्रंसग सांगताना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला, अनेक कटू गोड अनुभव शेअर करताना डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या,जणू काय गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्या मनात हे सगळे दाठून /भरून, साठवले ले होते, त्याला आज त्यांनी वाट मोकळी करून दिली. त्यांच्या या भावनाविष अनुभवामुळे संपूर्ण सभासद गहिवरून गेले व आजचा जागतिक दिव्यांग दिन ख-या अर्थाने सत्कारणी लागला असे प्रत्येकाला वाटत होते.
याप्रसंगी ग्रामसेवक संघटनेचे सचिव नितीन चव्हाण, पत्रकार संजय कांबळे,सभापती अस्मिता जाधव, कृषी विस्तार अधिकारी दिनेश घोलप, तसे अनेक दिव्यांग बांधव व भगिनी यांनी आपल अडचणी, समस्या, मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी केले तर आभारप्रदर्शन हेदूटणे जिप शाळेचे शिक्षक श्री चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमास सर्व विभागाचे प्रमुख, तसेच ग्रामसेवक व दिव्यांग कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जवळपास सर्व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
No comments:
Post a Comment