Saturday 17 December 2022

ग्रुप ग्रामपंचायत काटवाडी विकास कामांचा झंझावात !

ग्रुप ग्रामपंचायत काटवाडी विकास कामांचा झंझावात !

जव्हार-जितेंद्र मोरघा

जव्हार तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कासटवाडी येथे 15 वित्त आयोगाच्या निधीतून  विकास कामांचे उद्घाटन समारंभ लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत  यांच्या प्रयत्नातून पार पडला यावेळेस अनेक कामांचा समारंभ करण्यात आला

१) हाडे घरटपाडा येथे गटार व संरक्षण भिंत बांधणे,
२) धूमपाडा पुलाला लोखंडी ऱ्यालिंग बसवणे.
३) कासटवाडी येथे अंगणवाडी दुरुस्ती करणे.
४) कासटवाडी येथे कंपोष्ट पिट बांधणे. 

ही कामे घेण्यात आली असून या प्रसंगी गावातील नागरिक , ग्रामपंचायत उपसरपंच - सुलोचना चौधरी, ग्राम. सदस्य - त्रिंबक रावते, बाळू भोये, कुणाल सापटा, राजश्री टोकरे, नितीन टोकरे व कार्यकर्ते राहुल शेंडे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...