Monday, 26 December 2022

"राजीनामा द्या" राजीनामा द्या महाविकास आघाड़ीची घोषणाबाजी !

"राजीनामा द्या" राजीनामा द्या महाविकास आघाड़ीची घोषणाबाजी ! 

नागपुर दि २६ : 'बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे', 'महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक' 'राजीनामा द्या राजीनामा द्या ,मुख्यमंत्री राजीनामा द्या',

'द्या खोके, भूखंड ओके', 'घेतले खोके माजलेत बोके' 'कर्नाटक सरकार हाय हाय'  अशा घोषणा देत सहाव्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

हिवाळी अधिवेशनाचा आजचा कामकाजाचा सहावा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी आजपण विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.

No comments:

Post a Comment

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षतर्फे गरजू जेष्ठ नागरिकांना वॉकर, आधारासाठी स्टिक व इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग आदी साहित्याचे वाटप !!

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षतर्फे गरजू जेष्ठ नागरिकांना वॉकर, आधारासाठी स्टिक व इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग आदी साहित्याचे वाटप !! ** दारुखाना विभा...