Tuesday, 3 January 2023

भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची औरंगाबाद येथे जाहीर सभा संपन्न !

भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची औरंगाबाद येथे जाहीर सभा संपन्न !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ३ : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आयोजित विशाल जनसभा औरंगाबाद  येथे मोठ्या उत्साहात पार पडली. विकास गतिमान औरंगाबाद ची जनता लोकसभेसाठी भाजपाला निवडून देईल असा विश्वास भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी यावेळी व्यक्त केला. 

लोकसभा प्रवास २०२३ अंतर्गत झालेल्या या सभेस जनतेचा भरघोस उस्फुर्त प्रतिसाद प्राप्त झाला.

याप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना.भागवत कराड, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश जी, भाजपा राष्ट्रीय सचिव सौ.पंकजाताई मुंडे, भाजपा राष्ट्रीय सचिव सौ.विजयाताई रहाटकर, राज्य मंत्री अतूल सावे, आमदार हरिभाऊ नाना बागडे, आमदार प्रशांत बंब, आमदार नारायण कुचे,बाळा भेगडे, भाजपा महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा सौ.चित्राताई वाघ, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय औताडे आदी मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...