Tuesday, 3 January 2023

मतमोजणी स्थळाची विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर , जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय व पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी केली संयुक्त पाहणी !

मतमोजणी स्थळाची विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर , जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय व पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी केली संयुक्त पाहणी !
 
*निवडणूक कामात बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही* 

औरंगाबाद, अखलाख देशमुख,  दि ३ : मराठवाडा शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर ,जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी आज मतमोजणी स्थळ व स्ट्रॉंग रूमची संयुक्त पाहणी केली. येत्या आठ दिवसात मतमोजणी केंद्रात सोयी सुविधा उपलब्ध करून मतमोजणी केंद्र सज्ज ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. दरम्यान निवडणूक कामात कोणत्याही प्रकारचा बेजबाबदारपणा आणि दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही,असा इशारा त्यांनी दिला.

मराठवाडा शिक्षक मतदार संघातील निवडणूक येत्या ३० जानेवारी २०२३ रोजी होत असून मतमोजणी २ फेब्रुवारी रोजी होणार आहे .या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी आज मंगळवारी औरंगाबाद कलाग्राम समोरील एमआयडीसी चिकलठाणा , प्लॉट नंबर एफ १/१ येथे करण्यात येणाऱ्या मतमोजणी केंद्राची व स्ट्रॉंग रूम ची संयुक्त पाहणी करून विविध कामांच्या सूचना दिल्या.

 मतमोजणीच्या अनुषंगाने ज्या ज्या काही सोयी सुविधा उपलब्ध करावयाच्या आहेत त्या तातडीने करा, आजपासून कामाला लागा, निवडणुकीचे काम असल्याने या कामात कुठल्याही प्रकारची दिरंगाई व बेजबाबदार पणा खपवून घेणार नाही.आठ दिवसात मतमोजणी केंद्राची स्वच्छता, विद्युत,पाणी, मतमोजणी व्यवस्था ,पार्किंग व्यवस्था, आदी सोयीसुविधा उपलब्ध करून सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्याचे आदेश दिले. आठ दिवसानंतर मतमोजणीची पूर्वतयारी पाहणी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी निवडणुक विभागाचे अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस अधिकारी आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...