Wednesday, 18 January 2023

पालिका रुग्णवाहिनी यानगृहात रक्तदान केलेल्या कर्मचा-याचा भव्य सत्कार !

पालिका रुग्णवाहिनी यानगृहात रक्तदान केलेल्या कर्मचा-याचा भव्य सत्कार !

मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
               चिंचपोकळी पश्चिम येथील, पालिका रुग्णवाहिनी यानगृहात आयोजित केलेल्या, रक्तदान शिबिरात रक्तदान केलेल्या अधिकारी -कर्मचा-याचा भव्य सत्कार, बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या अधिका-यांच्या हस्ते भेट वस्तू देऊन गौरवण्यात आले. यानगृहात कर्मचा-याचा वार्षिक मेळावा व पूजेचे आयोजन केले होते. या सोहळ्यास मुख्य लेखा परीक्षक - सिताराम काळे, सह आयुक्त - अमित कुमार, सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता-मोहन जोशी, कूपर रुग्णालय अधिष्ठाता - शैलेश मोहिते, कायदा अधिकारी - सुनील सातवणे, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या - रश्मी लोखंडे, इ- विभाग सहायक आयुक्त - अजय कुमार यादव सह सुधीर परकोळ, शैलेश म्हात्रे, सुनील सावंत, सुरज पवार, मालोजी कोले व अशोक जाधव आदि अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. यांनगृह व भोलानाथ मंदिर फुलांनी - रोषणाई करून सजविण्यात आहे होते.यान गृहातील कर्मचा-यांनी विविध करमणुकीचे कार्यक्रम केले.
              श्री स्वामी समर्थ कट्टा परिवाराच्या वतीने "स्वामी गीत माला" बहारदार  स्वामी गीते सादर केली.पूजा समिती अध्यक्ष-प्रकाश जेधे, सचिव-श्रीकृष्ण खोडके, कोषाध्यक्ष-धनंजय सोरटे, मनीष झोरे, संपत डोंगरे व हितसिंग राठोड, एकनाथ शिर्के, गजानन घाग, राजेंद्र चव्हाण, व राकेश आचरेकर यांनी फारच मेहनत घेतली होती.सूत्रसंचलन - गोपीनाथ कुंदे यांनी केले.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...