Wednesday, 18 January 2023

श्री भैरी भवानी देवी प्रतिष्ठान (वीर) तर्फे एक सदा बहार नाटक "कोकणचा साज संगमेश्वरी बाज" या दर्जेदार नाटकाचे ४ फेब्रुवारीला आयोजन !

श्री भैरी भवानी देवी प्रतिष्ठान (वीर) तर्फे एक सदा बहार नाटक "कोकणचा साज संगमेश्वरी बाज" या दर्जेदार नाटकाचे ४ फेब्रुवारीला आयोजन !

मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर /दीपक कारकर) :
           श्री भैरी भवानी देवी प्रतिष्ठान (वीर) तर्फे एक सदा बहार नाटक "कोकणचा साज संगमेश्वरी बाज" या  दर्जेदार नाटकाचे आयोजन वीर देवपाट गावातील शैक्षणिक उपक्रम निधी संकलन या उपक्रमाच्या माध्यमातून चिपळूण तालुक्यातील वीर गावच्या तरुण युवकांचा हा स्तुत्य उपक्रम आहे. श्री भैरी भवानी देवी प्रतिष्ठान (वीर)आयोजित हास्याची परिपूर्ण मेजवानी असणारा कार्यक्रम कोकणचा  साज, संगमेश्वरी बाज शनिवार दि.४ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रौ ठिक ८-३० वा. परेल येथील दामोदर नाट्यगृह, परेल येथे सादर होणार आहे. 

हा त्यांचा ३१२ वा प्रयोग आहे. या कार्यक्रम मधील होणाऱ्या नफ्यातून १०० टक्के रक्कम ही वीर गावातील तीन शाळेला देण्यात येणार आहे. घेवडे वाडी नं - २ शाळेला ५० टक्के तर जावळे वाडी - ४ ला २५ टक्के आणि न्यू इंग्लीश स्कूल वीरला २५ टक्के अशाप्रकारे या तीन शाळेना मदत करण्यात येणार आहे.एक हात मदतीचा... आपल्या शाळेच्या विकासासाठी एक प्रयत्न आहे.गावच्या शाळेला यथाशक्ती मदत देण्याचा प्रयत्न असून या कार्यक्रमला कोकणवाशीय मुंबईकर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी चंद्रकांत जावळे - 8655889299, दशरथ जावळे - 9769538572 यांच्याशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...