Friday, 20 January 2023

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करा - 'शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत' यांची मागणी

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करा - 'शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत' यांची मागणी

  बुलडाणा, अखलाख देशमुख, दि २० :  हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी *शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत* यांनी केली आहे. यासंदर्भात बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना आज दिनांक २०/०१/२०२३ रोजी निवेदन पाठविण्यात आले आहे.
   महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी आणि हिंदूंच्या न्याय हक्कांसाठी वाणी, लेखणी आणि कुंचल्याच्या माध्यमातून स्वाभिमानाचा लढा उभारणारे, तळागळातील कार्यकर्त्यांना सत्ता पदांच्या खुर्च्यावर बसवणारे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारीला जयंती आहे. महापुरुषांच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने आधीच शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश केला आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी,  मागणी बुलढाणा जिल्हा  शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे. 
      यावेळी उपजिल्हा प्रमुख संजय हाडे, विधानसभा संघटक अशोक इंगळे, शहर प्रमुख हेमंत खेडेकर, युवासेना तालुका प्रमुख निलेश राठोड, शहर प्रमुख सचिन परांडे, यु से उप तालुका प्रमुख मोहन निमरोट, रामेश्वर शिंदे, रणजित राजपूत, नारायण यंगड यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...