कै शोभाबाई पांचाळ यांच्या सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाबण्यासाठी आंदोलकांना बदनाम करण्याचे कट कारस्थान.. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !
अंमळनेर, प्रतिनिधी... अमळनेर उपविभागीय अधिकारी यांनी अमळनेर येथील कै शोभाबाई पवार व झोपडपट्टी वासी यांचे आंदोलन दडपण्यासाठी नगर पालिका मुख्याधिकारी यांची बाजू आंदोलक नेते यांना नोटीस दिली आहे की, 24/12/2022 चे पत्रातील भाषा .. अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना धमकावण्याची आहे.. याबाबत सविस्तर निवेदन काल रोजी जळगाव जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांना भारतीय कमुनिस्ट पक्ष तर्फे देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, अंमळनेर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्याशी आमचे खाजगी वैर नाही परंतु दिनांक 18/12/22 ... रोजी कार्यालयीन वेळा नंतर अंमळनेर येथील फायनल प्लॉट नंबर 123 वर 2013 साली मंजूर शॉपिंग सेंटर बांधायचे आहे सांगून 50/60 वर्षापासून रहिवासी असलेले पांचाळ रहिवासी चे ताबे उध्वस्त करणे साठी य नगरपालिकेचे अतिक्रमण पथक प्रमुख श्री राधेश्याम अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात पांचाळ वस्तीवर बुल्डोझर फिरवण्यासाठी पाठवले .त्यावेळी तेथील महिला शोभाबाई पांचाळ उ व ४५ या आपला निवारा जाणार आता कसे होणार? या धसक्यात तत्क्षणी मरण पावल्या .त्यामुळे त्यांचे प्रेतच संतप्त लोकांनी तहसीलदार कार्यालयासमोर नेले या बाबीला अमळनेर नगरपालिका मुख्याधिकारी श्री सरोदे हेच जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. यासाठी 19 नोव्हेंबर 2023 पासूनअमळनेर तहसीलदार कार्यालयापासून व पोलीस खात्यापर्यंत पत्रव्यवहार सुरू आहे. अमळनेर ला उप विभगिय अधिकारी यांचे कार्यालय असलेने त्यांनाही निवेदने दिली.. दुसरीकडे
*लोकांच्या नजरेतून या घटनेला शोभाबाई यांचा मृत्यूला जबाबदार अमळनेर नगरपालिकेचे सीओच आहेत बुलेट डोझर पाठवण्याच्या निर्णय अमानवीयच होता. म्हणून त्यांचेवर कारवाईसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष लाल बावटा शेतमजूर युनियन लोकांना साथ देत असून सनदशीर आंदोलन करीत आहे. अर्ज निवेदने अमळनेर तहसीलदार पोलीस स्टेशन आणि त्याबरोबर उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयाना देत असतो. पोलीस खाते व तहसीलदार आमच्या निवेदनाची नोंदही घेत येतात वरिष्ठांकडे पाठपुरावा माहितीही देत असतात *पण उपविभागीय अधिकारी यांनी पत्रव्यवहार बाबत एकदाही लेखी वा तोंडी उत्तर न देता संवेदन शून्य व्यवहार केला*
अमळनेर नगरपालिकेचे शोभाबाई पवार यांचे मृत्यूस जबाबदार व प्लॉट नंबर १२३ वरील रहिवासी आणि फेरीवाले टपरीधारक यांना त्रास देणारे मुख्याधिकारी सरोदे यांचा कैवार घेऊन दिनांक .24/12/22.....रोजी अमळनेर मुख्याधिकारी यांना केलेल्या पत्रव्यवहारतील भाषा बरोबर नाही अशी खुसपट काढून आंदोलक नेत्यांना पत्र देऊन ipc 499 खाली गुन्हा का दाखल करू नये ? असे कळवले आहे.यामागे शोभाबाई पवार यांचे वारस व तेथील रहिवासी यांचे बाजू घेऊन नगरपालिका मुख्याधिकारी विरोधी सनदशीर मार्गाचे जे आंदोलन करीत आहोत. ते थांबवावे म्हणून नोटीस पाठवली आहे असे भारतीय कम्युनिस्ट पक्ष लाल बावटा शेतमजूर युनियन ने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर नगरपालिका मुख्याधिकारी सरोदे यांचेवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करावा अशी मागणी करून खुलासा दिला आहे की, ते सदोष मनुष्य वध गुन्हा चे आरोपीत आहेत .हीच फायनल प्लॉटची 123 मधील लोकांची खात्री आहे त्यांनी दुकाने संकुल बांधकाम करताना फेरीवाला कायदा ,रहिवासी जागा नियमाकुल कायदा चे उल्लंघन चालवले आहे दिनांक.त्यातच 11/1/23 रोजी अचानक एका शिंपी यांची टपरी काढावयास गेले असता त्याने उदरनिर्वाहाचे साधन जाईल म्हणून आत्महत्या च प्रयत्न केला यासर्व बाबी त्यांच्या कार्यकाळात घडत आहेत तसेच मुख्याधिकारी यांनी आमच्याशी पत्रव्यवहार सुध्धा कार्यालयीन ATKET प्रमाणे नाही..
22/12/22 चे पत्रात तर तहसीलदार यांचे कार्यालयासमोर चक्री उपोषण करू नये म्हणून आम्हास परावृत्त करण्यासाठी तहसीलदार यांच्या अधिकारावर अतिक्रमण करणारी भाषा वापरली आहे तरीही आम्ही 4 दिवस तहसीलदार कार्यालयासमोर चक्री उपोषणाला बसलो असता तहसीलदार यांनी व पोलीस खाते यांनी समाधानकारक उत्तर दिल्यानंतर आम्ही वरिष्ठांकडे या संदर्भात पत्रव्यवहार सुरू केलेला आहे. दुसरीकडे अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी त्यानंचे विरुद्ध आम्ही चालवलेले आंदोलन थांबावे म्हणून त्यांनी कार्यालयीन कर्मचारी यांना हाताशी धरून निवडणूक आचारसंहिता भंग करून मोर्चा काढला.आणि त्याच वेळी आमचा खंडणी मागण्याचा व धमकवण्याचा उद्देश असून कार्यालयांचे कामात अडथळे आणत आहेत असा कांगावा करून आम्हास बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला आहे असा आरोप शेतमजूर युनियनचे नेते अमृत महाजन व लक्ष्मण शिंदे आदींनी जिल्हाधिकारी यांना सादर निवेदनात कथन केला आहे. यामागे आम्ही शोभाबाई पवार व रहिवासी झोपडपट्टी वासी यांना साथ देऊ नये वरिष्ठांकडे दाद मागू नये म्हणून धमकवण्याचे कुटील कारस्थान आहे. आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष लालबावटा या जनसंघटनेचे राजकीय पक्षाचे गेल्या कित्येक वर्षापासून कार्यकर्ते आहोत अन्याय अत्याचाराचा विरुद्ध लढणे आमचे ब्रीद आहे संविधानाने आम्हास तसा अधिकार दिला आहे असे सांगून
मुख्याधिकारी यांच्या बेकायदेशीर आणि अमाननीय व्यवहार या विरुद्ध आमचा सनदशीर लढा चालू आहे व न्याय मिळेपर्यंत चालू राहील असे निवेदनात नमूद केले असून
मागणी केली आहे की
१)अमळनेर नगरपालिका मुख्याधिकारी श्री सरोदे यांच्याविरुद्ध सदोषवधाचा गुन्हा दाखल करावा त्यांचेवर कारवाई व्हावी..
२) श्री सरोदे यांच्या काळातील अंमळनेर शहरातील दुकानांच्या व इतर बाबी संदर्भातील व्यवहाराची चौकशी व्हावी
अमळनेर नगरपालिकेचे सी ओ सरोदे यांनी फेरीवाला कायद्याचे उल्लंघन थांबवावे तसेच फायनल प्लॉट 123 वरील रहीवाशांचे ताबे नियमाकूल करण्याच्या 2011च्या परिपत्रकाचे पालन करावे.
अमळनेर नगरपालिका मुख्य व्यवहार या विरुद्ध आमचा सनदशीर लढा चालू आहे न्याय मिळेपर्यंत चालूच राहील पण त्यांचे व आमचे काही खाजगी वैर नाही त्यामुळे त्यांना धमकावण्याचा प्रश्नच येत नाही म्हणून त्यांचा बाजू घेऊन अंमळनेर उपविभागीय अधिकारी यांनी आम्हास दिलेली नोटीस रद्द बातल करावी असे आदेश व्हावेत अशा मागणी केली आहे निवेदनावर कॉ अमृत महाजन लक्ष्मण शिंदे वाल्मीक महिराले, अजय पवार, सर्फ्राजखान, जाहिरा बी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments:
Post a Comment