जिल्हा रुग्णालयासमोरील रस्त्याच्या कामाला सुरुवात - महापौर सौ.महाजन यांनी केली पाहणी
जळगाव, अखलाख देशमुख, दि २१ : महापालिकेकडून शहरातील सहा रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले असून विविध भागात रस्त्यांच्या कामाला गती आलेली आहे. त्यापैकीच एक रस्ता म्हणजेच पुष्पलता बेंडाळे चौक ते सिंधी कॉलनी चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम वर्षभरापूर्वीच मंजूर झाले होते. मात्र, पांडे चौक ते सिंधी कॉलनी चौकापर्यंतचे काम करुन, बेंडाळे चौक ते पांडे चौकापर्यंतच्या 300 मीटरच्या रस्त्याच्या कामाला शुक्रवार, दि.21 जानेवारी 2023 रोजी सुरुवात झाली.
या रस्त्याच्या कामाची शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका तसेच जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी शुक्रवार, दि.21 जानेवारी 2023 रोजी पाहणी केली.
महापौर सौ.महाजन यांनी अभियंत्यांशी चर्चा करुन माहिती घेतली व सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या. पुष्पलता बेंडाळे चौक ते पांडे डेअरी चौकादरम्यान याच रस्त्यालगत जिल्हा रुग्णालय आहे. या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात येणार्या रुग्णांना नक्कीच यामुळे दिलासा मिळणार आहे.
No comments:
Post a Comment