Tuesday, 3 January 2023

कल्याण महानगर पालिकेच्या पत्रकार कक्षात थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी !

कल्याण महानगर पालिकेच्या पत्रकार कक्षात थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी ! 

"जेष्ठ पत्रकार महादेव पंजाबी यांची पुन्हा पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती"

कल्याण, नारायण सुरोशी : कल्याण - डोंबिवली महानगर पालिका मधील नरसिंह खानविलकर पत्रकार कक्षात थोर समाजसुधारक सावित्री बाई फुले जयंती त्यांना अभिवादन करून साजरी करण्यात आली. 

या नंतर कल्याण डोंबिवली महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार महादेव पंजाबी यांची पुन्हा पत्रकारांनी बिनविरोध निवड केली आहे. कल्याण - डोंबिवलीच्या स्थानिक पत्रकारांच्या मूलभूत हक्कासाठी नवनिर्वाचित अध्यक्ष - श्री .महादेव पंजाबी हे संघर्ष करून, पत्रकारांच्या विविध योजनेसाठी कार्य करणार असे त्यांनी यावेळी आश्वासन दिले आहे .पत्रकार अमजद खान यांच्या सूचनेनुसार स्थानिक पत्रकारांनी महादेव पंजाबी यांनी बिनविरोध निवड मान्य केली असून, दबंग पत्रकार सुरेश काटे यांनी या प्रसंगी जाहीर दोन शब्द बोलुन विशेष समर्थन दिले आहे. तसेच पत्रकार - अमजद खान, बाबा रामटेके, अभिजित देशमुख,  इमत्याज खान, सुभाष पटनाईक, नारायण सुरोशी, राजू काऊ तकर, ज्येष्ठ पत्रकार, सिद्धार्थ वाघमारे, आर.आर.शर्मा, दीनानाथ कदम, अक्षय शिंदे, इस्माईल शेख यांनी जाहीर पाठिंबा देवून, महादेव पंजाबी यांची बिनविरोध अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. महादेव पंजाबी यांना सर्व पत्रकारांनी हार्दिक शुभेच्छा देवून, स्वागत केले.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...