उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितित सिल्लोड कृषि महोत्सवाचा समारोप !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ६ : सिल्लोड येथे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय कृषि प्रदर्शचा समारोप राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत तसेच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
प्रारंभी मंत्री उदय सामंत यांनी प्रदर्शनातील विविध दालनास भेट देऊन माहिती जाणून घेतली.
कार्यक्रमास माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा.गाढे, केशवराव तायडे, श्रीराम महाजन, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ काळे, वैजापूरचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, तनसुख झांबड, अकिल भाई, पंडित भुतेकर, नंदकिशोर सहारे, रउफ बागवान, दामुअण्णा गव्हाणे, महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई बन्सोड, दीपाली भवर यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी रवींद्र भोसले, दिनकर जाधव, तुकाराम मोटे, श्रीमती ज्योती देवरे, ज्ञानेश्वर बरदे, उदय देवळणकर, दिलीप देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment