पत्रकार दिनी संजय कांबळे सह तालुक्यातील इतरही पत्रकांराचा गौरव, जीवनदीप महाविद्यालयाचा पुढाकार !
कल्याण, (प्रतिनिधी) : ६जानेवारी या पत्रकार दिनाचे औचित्य साधून कल्याण तालुक्यातील जीवनदीप महाविद्यालय गोवेली मधील मास मिडिया विभाग आयोजित 'दर्पण दिन समारंभ या कार्यक्रमात पत्रकार संजय कांबळे यांच्या सह तालुक्यातील इतरही पत्रकांराचा यथोचित गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच ठाणे जिल्हा परिषदेच्या कल्याण पंचायत समितीच्या वतीने देखील पत्रकांराचा सन्मान करण्यात आला.
मराठी पत्रकारीतेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या ६ जानेवारी जंयती निमित्ताने देशभर पत्रकार दिन साजरा करण्यात येतो, याचेच औचित्य साधून जिल्ह्यातील आघाडीचे महाविद्यालय म्हणून नावलौकीक मिळवलेल्या गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयातील ,मास मिडिया विभागाने दर्पण समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते रविंद्र घोंडविदे सर, तर प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून अमेय महाजन, सहाय्यक प्राध्यापक, एस एन डिटी महिला विद्यापीठ, मुंबई, तर विशेष अतिथी म्हणून भाजपाचे सोशलमिडिया सेल प्रमुख प्रकाश गाडे हे उपस्थित होते.
यावेळी प्रथम पत्रकारीतेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पाहण्याच्या हस्ते दिपप्रज्वलन झाल्यावर या विभागाचे प्रमुख डॉ राहुल तौर यांनी प्रास्ताविक केले. तर पत्रकांराचे प्रतिनिधी म्हणून पत्रकार संजय कांबळे यांनी पत्रकारीतेत समोरील आव्हाने, अडचणी, समस्या, यावर आपले विचार मांडले, प्रमुख वक्ते अमेय महाजन यांनी पत्रकारीतेचे बदलते स्वरूप, यावर भाष्य केले, तर सोशलमिडिया सेल प्रमुख प्रकाश गाडे यांनी निपक्ष व निर्भीड पत्रकारिता कशी महत्त्वाची आहे ही भूमिका मांडली,
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र घोंडविदे सर यांनी प्रिंट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मिडिया यावर भाष्य केले, शिवाय पत्रकारीतेत उज्ज्वल भविष्य आहे, त्या करिता चिकित्सक बुध्दी मता महत्त्वाची असल्याचे सांगितले.
यावेळी तालुक्यातील पत्रकार संजय कांबळे, विलास भोईर, राजू टपा,उमेश जाधव, आणि नारायण सुरोशे आदी पत्रकारांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, शाल श्रीफळ, भेटवस्तू व एक पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी काँलेजचे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे आणि मास मिडिया विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर ठाणे जिल्हा परिषदेच्या कल्याण पंचायत समितीच्या आजच्या अखेरच्या बैठकीत ६ जानेवारी या पत्रकार दिनानिमित्त पत्रकार संजय कांबळे, सचिन बुटाला, विलास भोईर, राजू टपाल आदी पत्रकारांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सभापती अस्मिता जाधव, उपसभापती भरत गोंधळे, गटविकास अधिकारी अशोक भवारी, यांनी गौरव केला. याप्रसंगी सदस्य, भारती टेंबे, रंजना देशमुख, दर्शना जाधव, रेश्मा भोईर, यशवंत दळवी, भरत भोईर, पांडुरंग म्हात्रे, रमेश बांगर, आणि पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांना संविधान पुस्तीका भेट देण्यात आली.
No comments:
Post a Comment