Thursday, 5 January 2023

आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने विश्वभरारी फाउंडेशनच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन !

आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने विश्वभरारी फाउंडेशनच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन !

विश्वभरारी फाउंडेशनच्या वतीने आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम मुंबई विद्यापीठातील कलीना येथील जे पी नाईक भवन सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब देसाई होते. आणि प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार व संपादक दैनिक प्रहारचे डॉ. सुकृत खांडेकर, अग्निशिलाचे संपादक अनिल गलगली, हुंबनाथ पांडेय, प्रधान संपादक शोधावरी मुंबई विद्यापीठ तसेच आदित्य दुबे अध्यक्ष मुंबई हिंदी पत्रकार संघ हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लता कुठे यांनी केले. प्रमुख वाक्यांनी त्यांच्या मनोगतातून पत्रकारिता कालची, आजची आणि उद्याची यावर भाष्य केले. 

तसेच काही सुप्रसिद्ध पत्रकाराचे या निमित्ताने सन्मान केले. मा. गोविंद येतयेकर, पंकज दळवी महेश पवार, सोनू श्रीवास्तव, कल्पना राणे, सुधीर हिंगेस्टे आशा पत्रकार मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. तसेच भरारी प्रकाशन निर्मित  प्रशांत राऊत लिखीत  पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन सुप्रसिद्ध लेखक अभिनेते प्रकाश राणे यांनी केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तसेच लेखिका जयश्री संगीतराव, लेखक राजेंद्र वाणी,  अनुयोग विद्यालयाचे संचालक सतीशचंद्र चिंदरकर हेही उपस्थित होते.

लता गुठे
संस्थापक विश्वभरारी फाउंडेशन

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...