आर्ट व्हिजन ग्रुप कला तर्फे ११ वे चित्रकला प्रदर्शन- २०२३ चे प्रभादेवी येथे आयोजन !
मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर /दीपक कारकर) :
आर्ट व्हिजन ग्रुप कला तर्फे दि.१३ ते १५ जानेवारी 2023. पु. ल. देशपांडे कलादालन, रविंद्रनाट्य मंदिर, सिद्धीविनायक मंदिर जवळ, सयानी रोड, प्रभादेवी. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे ११ वे चित्रकला प्रदर्शन भरविण्यात येत आहे.
या चित्रकला प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध रंगछटांमधून, रंगांच्या माध्यमातून विविध विषयांवर केलेली कलाकृती.अनेक बोलकी भाष्य, चित्र जे पाहायला भावूक, आकर्षक, साक्षात निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद आणि नकळत बोध देखील देतात.
आर्ट व्हिजन ग्रुप कला प्रदर्शन-२०२३ या कलाप्रदर्शनासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्हा, तालुका आणि गावाच्या कान्या कोपऱ्यातून कलाध्यापक, कला शिक्षक, प्रसिद्ध चित्रकार व विविध शाळा - कॉलेजमधून विद्यार्थी आणि कलाप्रेमी सहभागी झालेले आहेत. या सर्वांना एकत्र आणण्याचा विचार मंथनासारखा आहे. एक विचारवंतांचा मंच तयार करणारे, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक संघर्ष पाहिले व केलेत स्वतःला वाहून नेणारे, त्यातून त्यांनी स्वतःचा अनुभवाचा वापर केलेला, संघर्ष करण्याची वेळ येणाऱ्या कलाकारांवर येऊ नये त्यासाठी स्वतः खस्ता खाऊन सन्मा. श्री. अर्जुन धाकू माचिवले सर, श्री. महेश कदम सर, श्री. रियाज काझी सर, श्री. जावेद मुल्ला सर या महान कलाकारांनी केलेला संकल्प म्हणजेच आर्ट व्हिजन ग्रुप कला प्रदर्शनची स्थापना केली.
समाजातील पुढील कलावंतांना ,प्राध्यापकांना व सर्व कलाकारांच्या कलेला वाव मिळावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे ,कमीपणा वाटू नये आणि कलेतून दुर्लक्ष होऊ नये म्हणून या कलाप्रदर्शनाची निर्मिती केली.कारण आज या मायानगरी मुंबईत किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही प्रदर्शन भरावे तर त्यासाठी खूप खर्च लागतो व काही ठिकाणी काही वर्षांचे तप करावे लागते.
त्यामुळे कलाकारांनी कला प्रदर्शनाकडे पाठ फिरवू नये तसेच त्यांना एक प्लॅटफॉर्म व एक मंच मिळावा यासाठी ताठ मानेनं आपलं हक्काचा मंच उभा केला.असा हा वरील कलाकारांचा आपल्या जीवनातील धावपळ, तळमळ, चिकाटी मेहनत आणि संघर्ष यातून त्यांनी उभा केलेला हा संकल्प. गेली अनेक वर्ष आर्ट व्हिजन ग्रुप कला प्रदर्शनासाठी मोठ्या हजारोच्या संख्येने उपस्थित असणारे कला रसिक व कलाप्रेमी यांनी या कला प्रदर्शनासाठी भेट दिल्या आहेत आणि देतात. तसेच यावर्षी सुद्धा आपणास सर्व महाराष्ट्रातील तमाम कलाकार, कलाप्रेमीनं साठी सर्व कलारसिकांसाठी प्रदर्शन खुले राहणार आहे तरी प्रदर्शनासाठी आपण सर्वांनी आवर्जून भेट द्यावी ही विनंती. प्रदर्शनासाठी आलेले व येणारे सर्व रसिक व कलाप्रेमीचे व कलाकारांचे प्रमुख पाहुण्याचे हार्दिक हार्दिक स्वागतच करीत आहोत.प्रवेश विनामुल्य आहे. आयोजक श्री. अर्जुन धाकु माचिवले, श्री.महेश कदम, रियाज काझी, जावेद मुल्ला आहेत. या प्रदर्शनासाठी प्रमुख अथिती प्राध्यापक डाँ.गणेश तरतरे (ज.जी.कला महाविद्यालय मुंबई), विजयराज बोधनकर ( प्रसिद्ध आर्टिस्ट ) असणार आहेत. भाग घेणाऱ्या सर्व कलाकारांना कलामहर्षी बाबूराव पेंटर सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये भाग घेणारे कलाकार १) महादेव गोपाळे, २) दिगंबर मांडवकर, ३) अरूणा फाठक, ४) अल्का पांडे, ५) योगिता कोलगे, ६) रिंकू सरदार (रॉय), ७) संतोष माने, ८) महेश भोपी, ९) रुस्तम पठाण, १०) भावना मेहता, ११) तुषार दुखंडे, १२) मनोज पाटील, १३) अरबांज उस्मानी, १४) मनाली कोहपरे, १५) सरीता कोडापे, १६) जयदिप शेट्टी, १७) सुनिल वागळे, १८) राजश्री देसाई, १९) संदिप जोयशी, २०) प्रदीप अग्रवाल, २१) बी. मेघमाला, २२) ललिता चव्हाण, २३) पुनम सैनी, २४) स्वाती नाझरे, २५) प्रदिप ताडमारे (अँडवोकेट), २६) मुरलीधर कुंभार, २७) संदिप पाटील, २८) सुनिल सुर्यवंशी, २९) दिप्ती कांबळे, ३०) रियाज काझी, ३१) जावेद मुल्ला, ३२) महेश कदम, ३३) अर्जुन माचिवले असे आहेत. अधिक माहितीसाठी आयोजक अर्जुन धाकु माचिवले- ९३२१०४३९२१ /९८३४१२२६४६,
महेश कदम- ९७६८२५५९८९ यांच्याशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment