Wednesday, 11 January 2023

सिल्लोड महोत्सव येथील शंकरपटाचा थरार विजेत्यांना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते बक्षीसाचे वितरण !

सिल्लोड महोत्सव येथील शंकरपटाचा थरार विजेत्यांना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते बक्षीसाचे वितरण !
औरंगाबाद/सिल्लोड, अखलाख देशमुख, दि ११ : सिल्लोड महोत्सव अंतर्गत सिल्लोड येथील दोन दिवसीय राज्यस्तरीय जंगी शंकरपटात औरंगाबाद जिल्ह्याच्या बोरवाडी येथील राजू चव्हाण आणि तात्याराव राठोड यांच्या बैल जोडीने 6.51 सेकंदाचा टप्पा पार करून प्रथम क्रमांक पटकावला. तर मध्यप्रदेशातील सालाबिडी येथील अकलेश पटेल यांच्या बैल जोडीने 6.52 सेकंदात टप्पा पार करून द्वितीय क्रमांक घेतला. प्रथम आलेल्या जोडीच्या मालकाला बुलेट,तर द्वितीय क्रमांकाच्या मालकाला होंडा युनिकॉर्न यांसह उर्वरीत 4 विजेत्यांना प्रत्येकी मोटर सायकल तर गुणानुक्रमे जवळपास 30 जणांना 65 हजार ते 9 हजार असे एकूण रोख 6 लाख रुपयांचे बक्षिसे बैल जोडीच्या मालकांना वितरण केले. शंकरपटाचा थरार पाहण्यासाठी शेतकरी व शंकरपट प्रेमींची प्रचंड संख्येने उपस्थिती होती.

    या स्पर्धेत ड गट तयार करण्यात आला होता. यात चालू वर्षातील नवीन वासरांचा समावेश होता. ड गटातील   प्रेम उमाजी चव्हाण यांच्या बैल जोडीने 6.53 सेकंदात होंडा शाईन मोटर सायकल असलेला पहिला क्रमांक पटकावला. जावेद खा मजीत खा व  सोनूसेट भोईटे या दोघांच्या  बैल जोडीने 6.59 सेकंदाचा टप्पा पार केल्याने या दोघांना संयुक्त पणे दुसरे बक्षीस पटकावले त्यांना 43 इंच एलईडी टीव्ही बक्षीस देण्यात आली. तर रुद्र रवींद्र राठोड यांच्या बैल जोडीने 6.64 सेकंदात फ्रीज असलेले तृतीय क्रमांक पटकावला.

No comments:

Post a Comment

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत स्वच्छतेचा बोजवारा..

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे स्वच्छतेचा बोजवारा.. घनकचरा विभागाचे उपायुक्त कोकरे कोकलत आहेत कर्मचारी घरी बसून पगार घेत आहेत.. ...