Wednesday, 4 January 2023

शिंदे -भाजप सरकार जनतेच्या मनात भष्ट्र ; गद्दारांचे राजकीय अस्तित्वही येणार धोक्यात - *विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा दावा*

शिंदे -भाजप सरकार जनतेच्या मनात भष्ट्र ; गद्दारांचे राजकीय अस्तित्वही येणार धोक्यात - *विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा दावा*

वैजापूर, अखलाख देशमुख, दि ४  :- 
विश्वासघाताचे राजकारण करुन सत्ता भोगणाऱ्या गद्दारांचे राजकीय अस्तित्व येणाऱ्या निवडणुकीत शिल्लक राहणार नसल्याचा दावा विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी वैजापूर येथे बोलताना केला. दिवंगत लोकनेते माजी आ. आर. एम. वाणी यांच्या जयंती निमित्त शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्याचा मेळावा, रक्तदान शिबीर, पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी सूरज लाॅन येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आ.भाऊसाहेब पा. चिकटगावकर, सहसंपर्क प्रमुख अँड. आसाराम रोठे, माजी सभापती अविनाश गलांडे, ता्लुकाप्रमुख सचिन वाणी, संजय निकम, प्रकाश चव्हाण, आनंदीताई अन्नदाते, प्रतिभाताई जगताप, महिला आघाडीच्या तालुका संघटक वर्षा जाधव यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डोंगरथडी, गंगथडी, शिवनाथडी या परिसरातील चिकटगावकर समर्थकांनी मान्यवरांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला.

राज्याचे मुख्यमंत्री ते मंत्र्याचे भष्ट्राचार, भाजपाच्या नेत्यांकडून अनेक वेळा महापुरुषाचा होणारा अवमान या प्रकारावर सत्ताधा-यांचे वाभाडे काढण्याचे काम विरोधी पक्ष सातत्याने करत असल्यामुळे शिंदे -भाजप सरकार जनतेच्या मनात भष्ट्र सरकार असल्याचे सत्य ठसवल्याचा दावा त्यांनी केला.

वैजापूर विधानसभा मतदारसंघात दिवंगत लोकनेते आर एम वाणी यांनी शिवसेना पक्ष संघटनेची चांगल्या पद्धतीने बांधणी केलेली आहे.त्यात नव्याने माजी आ.भाऊसाहेब पा. चिकटगावकरांची शक्ती सोबत आल्यामुळे या मतदार संघात येत्या निवडणुकीत निश्चित परिवर्तन घडून येईल.औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतील पराभवाची परतफेड शिवसेना कडून केली जाईल. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला पाठबळ देणा-या या मतदार संघात पाय रोवण्याचे स्वप्न भाजपने पाहू नये असा इशाराही दानवेंनी दिला. 

वैजापूर येथे आयोजित शिवसेना पदाधिकारी मेळावा संपन्न झाल्यानंतर विरोधीपक्षनेते जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी गावा गावांतून, वाड्या वस्त्यांतून मेळाव्यासाठी आलेल्या शिवसैनिकांसोबत बसून भोजनाचा आस्वाद घेतला.

..ठाकरे सेनेचे शक्तिप्रदर्शन... 
लोकनेते माजी आ.आर.एम.वाणी यांच्या जयंती निमित्त शिवसैनिकांनी शहरातून भव्य मिरवणूक काढत वैजापूर तालुक्यातील शिवसेना गद्दाराच्या मागे नसून निष्ठावंत असल्याचे दाखवून दिले. शिंदे सेनेत नेते गेले मात्र कार्यकर्ते शिवसेनेत कायम आहेत हे लक्षात ठेवा वाजत गाजत निष्ठावंतांची शक्ती दिसून आली.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...