Wednesday, 4 January 2023

भिवंडीतील काल्हेर येथील परशुराम धोंडू टावरे येथे "अनंत तरंग" महोत्सव उत्साहात संपन्न !

भिवंडीतील काल्हेर येथील परशुराम धोंडू टावरे येथे "अनंत तरंग" महोत्सव उत्साहात संपन्न !

"सरपंच हेमंत घरत" यांच्या हस्ते उद्घाटन..

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम करत आहो_अध्यक्ष _राजू पाटील.

भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील परशुराम धोंडू टावरे येथील प्रांगणात सुरू असलेला "अनंत तरंग" महोत्सव आज (दि,४/१/२०२२) रोजी मोठ्या दिमाखात पार पडला. या महोत्सवाचे उद्घाटन कोपर गावचे नवनियुक्त सरपंच श्री हेमंत सूर्यकांत घरत यांच्या हस्ते झाले. 

या ठिकाणी पुष्पलता मधुकर मढवी, कॉलेज, अभिनव बालमंदिर ताडाळी, भाग शाळा_काल्हेर, माधवराव बाल मंदिर_काल्हेर, या शाळेच्या जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 

अध्यक्ष श्री.राजू पाटील यांनी गेल्या पाच वर्ष पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याचे काम करत आहेत.पूर्वी  दर वर्षी सहलीचे आयोजन करण्यात येत होते, परंतु सहली दरम्यान विविध प्रश्न उद्भवू लागल्याने व चिंतेचा विषय बनल्याने श्री. राजू पाटील यांनी सहली रद्द करून याच प्रांगणात विवीध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांचा सुप्त कला गुणांना वाव देण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. पुढच्या वर्षी याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने "परशुराम तरंग" व "माधवराव तरंग" महोत्सव करण्याचे ठरवले आहे.

या कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांचा सत्कार श्री. राजू पाटील , ॲड.श्री.समीर पाटील व श्री. छत्रपती पाटील यांनी केला. 

तसेच याच प्रंगणात विविध स्टॉल व खेळण्याचे नियोजन करून सहलीचे व जत्रेचे स्वरूप आणण्याचे प्रयत्न केला आहे.तसेच महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देखील मिळू लागल्याचे पालक वर्गाकडून बोलले जात आहे. 

या महोत्सवाला मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.या कार्यक्रमा दरम्यान आलेल्या विद्यार्थ्यांना सस्नेह भोजनाचा आयोजन देखील करण्यात आल्याने कदाचित हे तालुक्यातील पहिलेच आयोजन असल्याचे पालक वर्गाचे म्हणणे आहे. 

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोपर गावचे  वरिष्ठ पत्रकार श्री.अरुण पुंडलिक पाटील व नव नियुक्त सदस्य श्री.संजय पांडुरंग पाटील, श्री.प्रभाकर लक्ष्मण पाटील व सौ.अस्मिता रुपेश घरत, माजी सदस्य श्री.रुपेश गुरुनाथ घरत उपस्थीत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.राजू अनंत पाटील, सल्लागार ॲड. श्री.समीर पाटील, उपाध्यक्ष श्री.छत्रपती पाटील सह इतर मान्यवर उपस्थित होते. 

या वेळी सरपंच श्री हेमंत घरत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे, आणि त्याच शाळेच्या कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटनाला बोलवले हे मी माझे भाग्य समजतो. अध्यक्ष श्री.राजू पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी अश्याच प्रकारे इतरही कार्यक्रम राबवावे जेणे करून विद्यार्थ्यांनमध्ये व पालक वर्गात उत्साह वाढेल अशी विनंती केली. सदस्य श्री.संजय पाटील यांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यावेळी सगळ्यांचे मन भरून आले. 

या महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध कला कृतीचे प्रदर्शन भरवले होते.आलेल्या पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कला गुणांची प्रशंसा केली.            
   ‌

शब्दांकन - अरुण पाटील, भिवंडी (कोपर) 
   ‌

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...