समीर विजय खाडिलकर यांना "आदर्श पत्रकार पुरस्कार" २०२३ जाहीर !
१५ जानेवारीला जॉय सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन , स्नेहसंमेलन व पुरस्कार वितरण सोहळा-२०२३ दादरला होणार साजरा
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
कोविड-१९ या महामारी काळात प्रत्येकजण आपआपल्या परीने जी काही मदत करता येईल ती करत होता. बोरीवली येथील सामाजिक कार्यकर्ता, महाराष्ट्र हरित सेना वन विभाग- महाराष्ट्र शासन सदस्य, माझी वसुधरा मित्र( पर्यावरण व वातावरनिय बदल विभाग- महाराष्ट्र शासन), माहिती अधिकार/पोलीस मित्र /पत्रकार संरक्षण सेना चे मुंबई जन संपर्क अधिकारी समीर विजय खाडिलकरही याला अपवाद नाहीत. समीर विजय खाडिलकर यांना सेवार्थ उपक्रमांची चळवळ असे ब्रीद वाक्य घेऊन मुंबईसह कोकण आणि अनेक जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, कला, क्रीडा, सांस्कृतीक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जॉय सामाजिक संस्थातर्फे श्री. समीर विजय खाडिलकर यांच्या पत्रकारिता / सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना "आदर्श पत्रकार -२०२३" या पुरस्काराने १५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०-३० वाजता वर्धापन दिन, स्नेह संम्मेलन, पुरस्कार वितरण सोहळात मुंबई महापलिकाचे माजी उप महापौर बाबुभाई भावानजी, जेष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राम नेमाडे, दै. आपलं महानगर संपादक संजय सावंत, कामगार नेते अविनाश दौड, दै. मुंबई मित्र संपादिका अनघा राणे, शिक्षक नेते जनार्दन जंगले, आरजू स्वाभिमान संघटना अध्यक्ष राजेंद्र मेहता,संस्था अध्यक्ष गणेश हिरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरजू सभागृह,३ रा मजला, रत्नमनी बिल्डिंग, कैलास लस्सी समोर, दादर पूर्व येथे सन्मानित करण्यात येणार आहे. सोबतच उल्लेखनीय काम केलेले पत्रकार आणि संस्था, शाळा, कॉलेज यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे.समीर खाडिलकर यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अनेकांनी त्यांना अभिनंदन सह मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment