ऑनलाईन हजेरी घेणेसाठी सूट द्यावी - 'बहुजन विकास आघाडी' कडुन तलसिलदारांना निवेदन !
जव्हार- जितेंद्र मोरघा :
जव्हार तालुक्यातील ऑनलाईन हजेरीच्या प्रणालीमुळे ९० टक्के कामे बंद आहेत .दरवर्षी जव्हार तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमीची कामे निर्माण होतात.परंतु ह्या वर्षी ऑनलाईन हजेरी मुळे अजूनही जव्हार तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायत मध्ये रोजगार हमीची कामे बंद आहेत तरी ज्या व्यक्तीची ऑनलाईन हजेरी लागणार नाही व ती व्यक्ती दिवसभर रोजगार हमीच्या कामावर काम करते परंतु त्याची ऑनलाईन हजेरी न लागण्यामुळे सदर व्यक्तीला काम करूनही कामाचा मोबादला मिळणार नाही त्यामुळे ती व्यक्ती रोजगार पासून वंचित राहू शकते .त्यामुळे ज्या व्यक्तीची ऑनलाईन हजेरी लागणार नाही त्या व्यक्तीला ऑफलाईन हजेरीची सूट देण्यात यावी .
No comments:
Post a Comment