Wednesday, 4 January 2023

कल्याण मुरबाड मार्गावरील वरप ते कांबा डांबरीकरणासाठी आमदार कुमार आयलानी कडून तीस लाखांचा निधी !

कल्याण मुरबाड मार्गावरील वरप ते कांबा डांबरीकरणासाठी आमदार कुमार आयलानी कडून तीस लाखांचा निधी !

कल्याण, (संजय कांबळे) : ठाणे जिल्ह्यातील बहुचर्चित कल्याण मुरबाड मार्गावरील वरप ते कांबा या दोन गावांच्या दरम्यान तातडीने डांबरीकरण करण्यासाठी उल्हासनगर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार कुमार आयलानी यांनी आपल्या निधीमधून सुमारे ३० लाखांचा निधी यासाठी देऊ केल्याची घोषणा आज सकाळी ९ वाजता कार्यालयात झालेल्या बैठकीत केली.

कल्याण नगर या मार्गावर म्हारळपाडा, वरप ते कांबा पाचवामैल या दरम्यान सिंमेट काँक्रीटीकरण करण्याचे काम गेल्या एक ते दिड वर्षांपासून सुरू आहे. सुरुवातीपासून नैसर्गिक तसेच मानवनिर्मित अडचणी यामध्ये आल्याने हे काम दिवसेंदिवस लांबत गेले.अशातच या परिसराचा परिपूर्ण अभ्यासाचा अभाव, अधिकारी, ठेकेदार यांच्यात समन्वयाचा अभाव, स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष, वाहतूक व्यवस्था, पोलीस प्रशासन यांच्यातील चर्चा, विचार विनीमय, आदीचा अभाव, अशा विविध अभावामुळे आणि संपूर्ण म्हारळपाडा ते पाचवामैल या दरम्यान सर्व रस्त्यावरच उखडून ठेवल्याने, ते अपुर्ण असल्याने या ठिकाणी अनेकांचे अपघात झाले, काही चा जीव गेला, तर काहिंना अंपगत्व आले, शिवाय किरकोळ जखमी, गाड्या नादुरुस्त होणे, श्वसनाचे आजार असे शेकडो प्रकरणे घडली आहेत. 

याविरोधात अनेकांनी उपोषण, तक्रारी, निवेदने, दिली होती. अखेर या परिसरातील नागरिकां नी चक्का जाम चा इशारा दिल्यानंतर हे काम १५ जानेवारी पर्यंत पुर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु कांमाची गती व स्थिती पाहता ते पुर्ण होईल असे वाटत नाही. म्हणजे पुन्हा सगळ्यांना अंनत अडचणी ना तोंड द्यावे लागणार होते. त्यामुळे हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा होईल तेव्हा होईल. परंतु आता आम्हांला वरप ते कांबा या दरम्यानचा रस्ता हा पुर्वीप्रमाणे डांबरीकरण असावा असे येथील नागरिकांना वाटत होते.

त्यामुळे लोकांची होणारी अडचण,नागरिकांना होणारा त्रास, लक्षात घेऊन आमदार कुमार आयलानी यांनी त्यांच्या दालनात नँशनल हायवे अँथोरटी, ठेकेदार, काही ग्रामस्थ पदाधिकारी यांची आज सकाळी ९ वाजता बैठक आयोजित केली होती. या बैठकीतील एकूणच सुर पाहता आमदार आयलानी यांनी आपल्या आमदार निधीतून या डांबरीकरणासाठी सुमारे ३० लाखांचा निधी देत असल्याचे सांगितले.त्यामुळे आतातरी या रस्त्यावर होणारा त्रास कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.तर आमदार कुमार आयलानी यांनी तात्काळ या बाबत लक्ष घातल्याने नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...