सिल्लोड मध्ये आयोजित कृषि प्रदर्शनाला आज पर्यंत दोन लाख शेतकऱ्यांनी दिली भेट !
औरंगाबाद/सिल्लोड, अखलाख देशमुख, दि ४ : येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सवातील प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी जवळपास २ लाख शेतकऱ्यांनी भेट दिली. यात विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह महिला बचत गट, विद्यार्थ्यांचा समावेश होता.*
कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी प्रदर्शनातील सर्व दालनाला भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम, नृत्य असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमास उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
No comments:
Post a Comment