शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटी मधे गरजू रुग्णांना मोफत ब्लॅंकेट वाटप !
*उमा आनंदा माहोर हिच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने महिला रुग्णांना अनोखी भेट*
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १४ : माणुसकी रुग्ण सेवा समूहाचे सभासद आनंदा माहोर यांची कन्या स्वर्गवासी उमा आनंदा माहोर हिच्या प्रथम पुण्यस्मरणाचा खर्च टाळून त्यांनी रुग्णसेवेसाठी गरजू रुग्णांना मोफत ४० ब्लॅंकेटचे वाटप माणुसकी समुहाच्या वतिने शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटी औरंगाबाद येथील वार्ड क्रमांक २९ व शासकीय" रुग्णालय आवारात गरजूंना मोफत वाटप केले.
सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यांनी रुग्णालयात दाखल रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले या कार्यक्रमासाठी डॉ संजय राठोड अधिष्ठाता घाटि औरंगाबाद, वैद्यकीय अधिक्षक डॉ आनंद कल्याणकर, प्रसुती विभाग प्रमुख श्रिनिवास कडप्पा सर, भिंगारे सर, परिसेविका विद्या निकुम, चंद्रकला चव्हाण, मनिषा कडु, पिंकी रामपुरे, दिक्षा काळे, सुवर्णा गर्जे, संध्या फड तसेच माणुसकी रुग्णसेवा समूहाचे समाजसेवक सुमित देविदास पंडित, आनंदा माहोर, समाजसेवीका सौ.पुजा पंडित, सौ.रंजना प्रशांत दंदे, व माणुसकी समूहाची टीमने सहकार्य केले.
No comments:
Post a Comment