Monday, 9 January 2023

कुस्तीपटू अभिजित कटकेने हिंद केसरीचा पटकावला !

कुस्तीपटू अभिजित कटकेने हिंद केसरीचा पटकावला !

पुणे, प्रतिनिधी : पुण्यातील कुस्तीपटू अभिजीत कटके याने मानाचा हिंदकेसरी किताब पटकावला आहे. भारतीय शैली कुस्ती महासंघाने दिनांक ५ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान हैदराबाद, तेलंगणा येथे अखिल भारतीय ५१ वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा -२०२३ आयोजित केलेली होती. या स्पर्धेत फायनलमध्ये हरियाणा सोमविर विरुद्ध अभिजीत कटके हा सामना झाला. या सामन्यात कटके याने 5 - 0 ने सोमविर याचा पराभव करून हिंद केसरी किताब पटकावला आहे.

अभिजीत कटके हा पुण्याच्या गणेश पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा पैलवान आहे. अभिजीतचे वजन या घडीला तब्बल 122 किलो आहे. अभिजीतला अमर निंबाळकर, भरत म्हस्के आणि हणमंत गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे. अभिजीतने 2015 साली युवा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला  होता. 2016 साली त्याने ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीत कांस्यपदकाचा मान मिळवला होता. अभिजीत एक परिपक्व पैलवान म्हणून ओळखला जातो. त्याचा बचाव आधीपासूनच भक्कम होता. पण आता त्याच्या आक्रमणालाही धार चढल्याचे दिसून येत आहे. 2017 साली झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभिजीत कटके यांनी स्पर्धा जिंकत महाराष्ट्र केसरीचा किताबही जिंकला होता, तसेच त्यानंतर पुढच्या वर्षी त्याला उपविजेता पद मिळाले होते. आत्ता त्याने हिंद केसरी हा किताब देखील पटकावला आहे.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...