Monday, 9 January 2023

ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद सर्वसाधारण तर कल्याण पंचायत समितीचे सभापती पद नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित !

ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद सर्वसाधारण तर कल्याण पंचायत समितीचे सभापती पद नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित !

कल्याण, (संजय कांबळे) ::ठाणे जिल्हा परिषदेचा कार्यकाळ १४ जानेवारी आणि या अंतर्गत येणाऱ्या ५ पंचायत समितींची मुदत ही ७ जानेवारी २०२३ रोजी संपुष्टात आल्याने आज या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली, यामध्ये झेडपी अध्यक्ष पद सर्वसाधारण तर कल्याण पंचायत समितीचे सभापती पद हे नागरिकांचा प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले. 

त्यामुळे मुदत संपलेल्या या जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासकीय राजवट लागू झाली आहे.
महाराष्ट्रातील ठाणे जिल्हा परिषद ही अंत्यत महत्त्वाची व मोठी जिल्हा परिषद आहे. या अंतर्गत शहरी व ग्रामीण भाग येत असल्याने हिचे महत्त्व अधिक वाढले आहे. कित्येक कोटींचे बजट या झेडपीचे असल्याने यामध्ये सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध विषय समितीत्यांचे सभापती होण्यासाठी प्रत्येक जण अथक प्रयत्न, परिश्रम करत असतात. निवडून आल्यावर लोकहिताची किती कामे होतात हा संशोधकांनाचा विषय आहे.

अशा या महत्त्वाच्या ठाणे झेडपीची मुदत १४ जानेवारी २०२३ रोजी संपत आहे, याचबरोबर या अंतर्गत येणाऱ्या कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि अंबरनाथ पंचायत समित्याची देखील मुदत ७ जानेवारी २०२३ रोजी संपलेली आहे. सध्याचे राजकीय उलथापालथ पाहून मुदत संपलेल्या झेडपीच्या व पंचायत समित्या च्या निवडणुका घेणे शक्य नाही हे सांगायला कोणा भविष्यवेत्याची गरज नाही. त्यामुळे आज जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सभापती पदाची आरक्षण सोडत जिल्हा नियोजन भवन येथे काढण्यात आली.

यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद हे सर्वसाधारण म्हणजे ओपन/खुला गटासाठी तर पंचायत समितीचे सभापती पदामध्ये कल्याण नागरिकांचा मागास प्रवर्ग, शहापूर अनुसूचित जमाती, भिवंडी अनुसूचित जमाती मुरबाड सर्वसाधारण (महिला) तर अंबरनाथ पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण म्हणजे खुल्या गटासाठी आरक्षित झाले आहे.

सध्या शिंदे फडणवीस सरकारचा फैसला कोर्टात गेला आहे, शिंदे गटाचे आमदार पात्र की अपात्र यावर सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. यामध्येच तारीख पे तारीख सुरू आहे. अशात मुदत संपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुका घेणे शक्य नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदवर मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल तर पंचायत समितीवर ते ते गटविकास अधिकारी यांची सत्ता (प्रशासन) राहणार आहे. त्यामुळे यापुढे जनतेचे काय? त्यांच्या कामांचे काय? 

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...