स्कॉलर डिजिटल इंग्लिश मिडीयम स्कूल स्नेहसंमेलनात महापौरांच्या उपस्थिती !
जळगाव, अखलाख देशमुख, दि ९ : सुबोध बहुउद्धेशीय युवा विकास प्रतिष्ठान संचालित स्कॉलर डिजिटल इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगाव येथे रविवार दि.८ जानेवारी २०२३ रोजी वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.
प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या संचालिका, जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ञ संचालिका सौ. जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते देवी सरस्वती च्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी महापौरांच्या हस्ते गुणवंत विध्यार्थीनीना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर सौ. सीमा भोळे, ॲड. महेश भोकरीकर तसेच मान्यवर कर्मचारीवर्ग व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment