घाटी रुग्णालय येथे येणा-या रुग्णांची संपामध्ये गैरसोय होता कामा नये - कांग्रेस शहर अध्यक्ष शेख युसूफ
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ३ : घाटी रुग्णालय येथे चालु असलेल्या डॉक्टरांच्या संपाबाबत घाटीचे अधिष्ठता डॉ.संजय राठोड व उपअधिष्ठता डॉ.सिराज बेग यांना औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने निवदेन करण्यात आले. घाटी येथे येणा-या रुग्णांची गैरसोय होवु नये म्हणुन औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांनी डॉ.संजय राठोड यांना अशी सुचना केली जर घाटी चे डॉक्टर संपावर गेले तर रुग्णांसाठी आपण पर्यायी डॉक्टरांची व्यवस्था करावी. मराठवाडयातुन सर्वसामान्य रुग्ण घाटी मध्ये येतात त्यांना संप आहे म्हणुन परत पाठविले जाते एकाही रुग्णाला परत न पाठवता त्यांचा वेळेवर उपचार करावा अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरुन आंदोलन करुन असे शेख युसूफ लिडर यांनी सांगीतले. यावेळी डॉ.संजय राठोड यांनी सांगीतले की आपल्या निवेदनाची दखल घेऊन आम्ही लवकरात लवकर पर्याय मार्ग शोधु असे सांगीतले. यावेळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment