Tuesday, 3 January 2023

कर्तव्यदक्ष महिलांचा महापौरांच्या हस्ते सन्मान !

कर्तव्यदक्ष महिलांचा महापौरांच्या हस्ते सन्मान !

जळगाव, अखलाख देशमुख, दि ३  :  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दि.३ जानेवारी २०२३  रोजी  नारीशक्ती कर्तव्यदक्ष महिलांचा सत्कार प्रथम नागरिक तथा महापौर तसेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. च्या संचालिका व जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ञ संचालिका सौ. जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते करून सन्मानित करण्यात आले. 

हा सोहळा दूध फेडरेशन जवळील महावीर नगरात श्रीकृष्ण मंदिर येथे  नगरसेविका सरिता अनंत नेरकर व रेणुका माता महिला विकास संस्थेच्या सदस्या सौ.हर्षदा स्वप्नील नेरकर यांनी आयोजित केला होता. यावेळी नगरसेविका सौ. गायत्रीताई शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, सौ.मेघा चंद्रशेखर कापडे,नीलकंठ गायकवाड साहेब मनोजभाऊ आहुजा,तडवी साहेब, दिलीपभाऊ माहेशवरी,अशोक पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...