Thursday, 5 January 2023

महाराष्ट्र ऑलिम्पीक क्रीडा स्पर्धांची सुरुवात शिवन्या भूषण शिसोदे यांच्या गगनभेदी शिव गर्जना ललकारीतून...

महाराष्ट्र ऑलिम्पीक क्रीडा स्पर्धांची सुरुवात शिवन्या भूषण शिसोदे यांच्या गगनभेदी शिव गर्जना ललकारीतून... 
        
      बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पीक असोसिएशन यांचे वतीने महाराष्ट्र ऑलिम्पीक क्रीडा स्पर्धांचे आयेाजन दि.05 ते 13 जानेवारी 2023 या कालावधी करण्यात येत आहे. या स्पर्धांच्या उद्घटन कार्यक्रमाची मुख्य ज्योत प्रज्वलन राजधानी रायगड किल्यावर शिवन्या शिसोदे यांच्या शिवगर्जनेतून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली  या कार्यक्रमाचे आयोजन मा. डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी, रायगड यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
     दि.04 जानेवारी 2023 रोजी सकाळी 09.00 वा. या मुख्य क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन रायगड किल्यावर करून श्री संजय गमरे सर, श्री वाढवल सर प्राध्यापक शिंगारे सर महाराष्ट्र  त्यांचे सहकारी महाराष्ट्र क्रीडा ज्योत निझामपुर – पाटणुस - ताम्हिणी घाट – मुळशी मार्गे  श्री शिवछपत्रती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे येथे नेण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पीक स्पर्धा आयोजन समितीचे पदाधिकारी, जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी तसेच क्रीडा विभागाचे अधिकारी – कर्मचारी, रायगड जिल्ह्यातील सर्व क्रीडा पुरस्कारार्थी, महाराष्ट्र ऑलिम्पीक स्पर्धांमध्ये सहभागी होणारे रायगड जिल्ह्यातील खेळाडू व सर्व शिक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

भिवंडी आगरी महोत्सवात संपादक डॉ. किशोर पाटील यांचा गौरव !!

भिवंडी आगरी महोत्सवात संपादक डॉ. किशोर पाटील यांचा गौरव !! ठाणे (एस. एल. गुडेकर) : सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारा आणि सामाजिक...