कल्याण ग्रामीण उपविभागात सहाशे ते सातशे विज कर्मचारी संपावर, एक लाख वीस हजार ग्राहकांचे भवितव्य अंधकारमय ?
कल्याण, (संजय कांबळे) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात महावितरण ,एम एसबी चे खाजगीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यातील वीज कर्मचारी आज मध्यरात्री पासून संपावर गेले असून कल्याण ग्रामीण भागातील टिटवाळा, खडवली, गोवेली या उपविभागातील सुमारे ६००/७०० कर्मचारी यामध्ये सहभागी झाले असून संप चिघळल्यास या परिसरातील तब्बल १ लाख २० हजार ग्राहकांचे भवितव्य अंधकारमय ठरू शकते.
महावितरण वीज कंपनीचे कार्यक्षेत्र असलेल्या मुंबई उपनगरात 'अदानी, या खाजगी कंपनीला वीज पुरवठ्यासाठी परवानगी देऊ नये या मागणीसाठी महावितरण चे कर्मचारी तीन दिवस संपावर गेले आहेत. या संपात महावितरण चे सुमारे दिड लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार अनेक संघटनेने या संपास पाठिंबा दिला आहे.
आधीच भाजपा सरकारने रेल्वे सह अनेक सार्वजनिक व्यवस्था खाजगी करण्याचा सपाटा लावला आहे. या विरोधात कर्मचाऱ्यांसह जनतेमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला असताना आता महाराष्ट्रात वीज वितरण कंपनी चे खाजगीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याच्या कारणावरून महावितरणचे कर्मचारी मध्यरात्री पासून संपावर गेले आहेत. कोकणासह सातारा, सांगली, आदी ग्रामीण भागात याचा परिणाम जाणवू लागला आहे.
सध्या महावितरण कंपनीला चांगला महसूल मिळू लागला आहे. आणि याच भागात 'अदानी, कंपनीला वीज वितरणचा परवाना देण्यात येणार आहे. तसेच महापारेषण व महाजनको या दोन कंपन्यामध्ये सुध्दा खाजगीकरण करण्यात येणार आहे.तर दुसरीकडे या कंपन्या जनतेच्या मालकीच्या रहाव्यात अशी भूमिका कर्मचारी संघटना नी घेत संप पुकारला आहे.
कल्याण ग्रामीण भागातील उपविभाग टिटवाळा, गोवेली आणि खडवली या मधील इंजिनिअर, लाईनमन, काँट्रक बेसीवरील कर्मचारी असे ६००/७०० कर्मचारी संपावर गेले आहेत. या उपविभागत सुमारे १ लाख २० हजार वीज ग्राहक आहेत, या शिवाय शेकडो छोटे मोठे उद्योग, धंदे, व्यवसाय आहेत, सध्या काही मेजर प्राँब्लेम निर्माण झाल्यास ते दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी नाहीत, दुपारी वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी व सरकारची बैठक आहे. या बैठकीत तोडगा न निघाल्यास या भागातील लाखो ग्राहक व उद्योगांचे भवितव्य अंधकारमय ठरु शकते. त्यामुळे या सरकारच्या बहुतांश निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याचा विचार आता लोकांनी करायला हवा.
No comments:
Post a Comment