वीर ग्रामविकास मंडळ,मुंबई ( रजि. ) तर्फे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा-२०२३ संपन्न !
मुंबई - ( दिपक कारकर ) :
चिपळूण तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या "वीर" गावातील गेली अनेक वर्षे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वीर ग्रामविकास मंडळ,मुंबई ( रजि.) तर्फे नुकताच दिनदर्शिका प्रकाशन सोहळा-२०२३ मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार दि.३० डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ०७ वा. जेजुस्कर क्लासेस, हॉल दादर ( मुंबई ) येथे पार पडला.
तरूणाईची उत्तम सांगड असणारे हे मंडळ पंचक्रोशीत अनेक उपक्रम राबवत बांधिलकी जपताना सामाजिक सौख्य राखताना दिसते.या सोहळ्याला अनंत कोदारे - ( अध्यक्ष (कुणबी विकास मंडळ मुंबई वहाळ विभाग ), शरद आग्रे - सचिव ( कुणबी विकास मंडळ मुंबई वहाळ विभाग ),संतोष अबगुल - ( संस्थापक - संतोष अबगुल प्रतिष्ठान ) आदी मान्यवर व मंडळाचे उपाध्यक्ष - संतोष दुर्गोळी, कार्यध्यक्ष - सुरेश भुवड, सचिव - दिनेश दुर्गोळी, खजिनदार - जगदीश जावळे सल्लागार-अनंत दुर्गोळी, कृष्णा शिगवण, यशवंत भुवड, सुरेश जावळे, रमाकांत जावळे व सर्व मंडळाचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर दुर्गोळी यांनी केले. प्रतिवर्षी मंडळाच्या आर्थिकदृष्ट्या प्रबळतेने भरारी घेण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ह्या स्तुत्य उपक्रमाचे अनेकांकडून अभिनंदनासह कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment