Tuesday, 3 January 2023

बेफिकीर, निर्दय महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा, रूपालीताई चाकणकर तसेच सचिव व सदस्य यांची हकालपट्टी करण्याची बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) उपनेते रविंद्र फाटक साहेब यांच्याकडे मागणी..:- *रूचिता अमित नाईक* *महिला आघाडी शहर संघटक*

बेफिकीर, निर्दय महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा, रूपालीताई चाकणकर तसेच सचिव व सदस्य यांची हकालपट्टी करण्याची बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) उपनेते रविंद्र फाटक साहेब यांच्याकडे मागणी..
:- *रूचिता अमित नाईक*
*महिला आघाडी शहर संघटक*

वसई, प्रतिनिधी : पालघर जिल्हात तसेच संपुर्ण महाराष्ट्रात महिलांवर वाढते  बलात्कार, हत्या, अत्याचार  लव्ह जिहाद, अशा धक्कादायक घटना घडत आहेत पालघर जिल्हात मागिल 6 महिण्यात 8 बलात्कार व 2 लव्ह जिहाद प्रकरण घडली. पोलिसांचा तपास सुरू आहे पण त्याचवेळी महिलांवर होणारे अन्यायावर महिला आयोगानेही दखल घेणे हि गरजेचे असते.

महिला आयोग अध्यक्षा यांचे याबाबत कुठे हि लक्ष नसल्याने महिला आयोगाचा सचिव या त्यांचे कार्यभार सांभाळताना दिसत आहेत.

गुन्हा घडल्यानंतर महिलांना मदत करणं हे जस महिला आयोगाचं काम आहे तसंच मुळात गुन्हे होऊ नयेत यासाठीचं वातावरण निर्माण करणं हेदेखील महिला आयोगाचं महत्त्वाचं काम आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी सिक्युटिरी ऑडिट करण्याची गरज आहे.

महिलेने पोलीसांत तक्रार करताच त्याचा  तपास करण्यास दिरंगाई होत असते अशा वेळेस महिला आयोग पोलिसांना तपासाबाबत विचारणा करू शकते. त्याचबरोबर तपास जलदगतीने करण्यासाठी निर्देशही देऊ शकते. तसेच महिलांना कोर्टकचेरीच्या प्रकरणात महिला आयोगा कडुन मदत मिळत नाही अशी तक्रार काही महिलांनी माझ्याकडे केली आहे.
तसेच महिला आयोग महाराष्ट्र रूपालीताई चाकणकर या कधीच त्यांचा दालनात हजर नसतात आणि पालघर तसेच महाराष्ट्रात महिलांवर वाढते अत्याचार वर महिला आयोग कोणतेही ठोस पावले उचलत नसुन अद्याप पर्यंत पिडीत कुटूंबाची देखिल भेट घेतली नाही की विचारणा केली नाही
याबाबत 

महिलांवरील वाढते अत्याचार आणि बेफिकीर, निर्दय महिला आयोगा वरिल अध्यक्ष, सदस्य सचिव यांना तात्काळ हटवुन त्याजागी कार्यक्षम कार्यतत्पर कायदेतज्ज्ञ महिला अध्यक्ष , सचिव सदस्य यांची नेमणुका करण्याबाबत मागणी रूचिता नाईक यांनी बाळासाहेबांची शिवसेना उपनेते जिल्हा संपर्क प्रमुख आ. रविंद्र फाटक यांच्या कडे केली...

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...