औरंगाबाद मध्ये "माँ साहेबांना" केले भक्तीगीतातून अभिवादन - *विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गायले गीत.*
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ५ :- तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्वर्गीय सौ.मीनाताई ठाकरे यांच्या ९२ जयंती निमित्त आज साजऱ्या होणाऱ्या "ममता दिनी" औरंगाबाद मध्ये त्यांना भक्तीगीतातून अनोखे अभिवादन करण्यात आले.
ममता दिनानिमित्त औरंगाबाद जिल्हा शिवसेनेच्या वतीने औरंगाबाद शहरात सुगम संगीत व भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्याचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित राहून माँसाहेब स्व.मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी दानवे यांनी "हे भोळ्या शंकरा" हे गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी, शिवसेना नेते माजी खा. चंद्रकांत खैरे, अशोक पटवर्धन, नंदकुमार घोडेले, किशोर काच्छवा,संतोष जेजुरकर, जयवंत ओक, गजानन बारवाल, हिरा सलामपुरे,गोपाळ कुलकर्णी, सचिन खैरे,अनिल जैस्वाल, बाळू गायकवाड, प्रकाश कमलानी, मकरंद कुलकर्णी, सीताराम सुरे, विनोद मिसाळ, संदीप शिंदे, दत्ता पवार, बाळू गायकवाड, जयसिंग होलिये, संदेश कवडे, देविदास रत्नपारखी, सतिष कटकटे, महिला आघाडीच्या विमलताई राजपूत, कलाताई ओझा, सूनिताताई आऊलवार, प्रतिभाताई जगताप, मिराताई देशपांडे, लक्ष्मीताई नारहिरे, दुर्गताई भाटी, नालिनिताई बाहेती, मीनाताई पाटील, अंजलिताई मांडवकर, अरूनाताई भाटी, भागूआक्का शिरसाठ, सुकन्याताई भोसले,राखिताई सुरडकर, सुष्मताई यादगिरे, आशाताई दातार यांच्यासह सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment