Wednesday, 4 January 2023

प्रा.जोगेंद्र कवाडे यांचा शिंदे गटाला पाठींबा !

प्रा.जोगेंद्र कवाडे यांचा शिंदे गटाला पाठींबा ! 

मुंबई, अखलाख देशमुख, दि ४ : प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स_ रिपब्लिकन_पक्षाने आज बाळासाहेबांची_ शिवसेना पक्षाला जाहीर पाठींबा देत युती करण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेब भवनात आयोजित करण्यात आलेल्या विशेष पत्रकार परिषदेत प्रा.कवाडे यांनी हा निर्णय जाहीर केला. 

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब_ठाकरे यांच्या विचारांना प्रमाण मानून सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर घडले. त्यानंतर सातत्याने लोकाभिमुख निर्णय घेण्याचा प्रयत्न सरकारने केला. याच निर्णयांनी प्रभावित होऊन पीपल्स रिपब्लिकन पक्षाने  जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

महाविकास आघाडीत असताना ज्या कामासाठी पाठपुरावा केला तरीही जी कामे अपूर्ण राहिली ती या सरकारने पूर्ण करण्याची तयारी दाखवल्याने त्यांनी समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. नामांतराच्या लढ्यात प्रा.कवाडे यांचा लॉंग मार्च प्रचंड गाजला होता. तोच मार्च आता योग्य ठिकाणी पोहोचला असल्याचे सांगून त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनापासून स्वागत केले. 

याप्रसंगी खासदार गजानन कीर्तीकर, माजी खासदार आंनदराव अडसूळ, खासदार राहुल शेवाळे, आमदार संजय शिरसाट, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे, प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, प्रवक्ते राहुल लोंढे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे तसेच पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...