Thursday, 16 February 2023

कल्याण पश्चिम येथील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासाचे आश्वासन !

कल्याण पश्चिम येथील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासाचे आश्वासन !


कल्याण, प्रतिनिधी :  कल्याण हे ऐतिहासिक शहर आहे. या शहराशी जिव्हाळ्याचे नाते आहे. या शहरासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही. कल्याण पश्चिम व कल्याण पूर्वेमध्ये दोन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभारावे, यासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून व शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करू.


तसेच कल्याणकरांची मेट्रोची मागणी आहे. ही मागणी लक्षात घेऊन मेट्रो १२ चा आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.


कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रबोधनकार ठाकरे सरोवर (शेनाळे तलाव) सुशोभिकरण, मलशुद्धीकरण केंद्र आंबिवली, मलशुध्दीकरण केंद्र वाडेघर (कल्याण प.) व बी. एस. यु. पी. अंतर्गत बांधलेल्या सदनिकांचे प्रकल्प बाधितांना वाटप आदी विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याणमधील यशवंतराव चव्हाण मैदानात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील, कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे, गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. भाऊसाहेब दांगडे आदी यावेळी उपस्थित होते.


यावेळी प्रबोधनकार ठाकरे तलाव उर्फ भगवा तलाव (काळा तलाव) याचे नूतनीकरण कामाचे लोकार्पण मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर चे वाटप करण्यात आले.


राज्य सरकार व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कल्याण मध्ये चांगले काम होत आहे.अथक प्रयत्नांनंतर बीएसयुपीची घरं आज पात्र लाभार्थ्यांना मिळत आहेत, प्रबोधनकार ठाकरे सरोवराच्या सुशोभीकरणामुळे , लोकार्पण सोहळ्यामुळे कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे , असे उद्गार केंद्रीय पंचायती राजमंत्री कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात काढले.

आमदार विश्वनाथ भोईर यांनीही यावेळी समयोचित भाषण केले.

खड्डेमुक्त मुंबई करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील रस्ते देखील खड्डे मुक्त करू तसेच तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छांमुळे बाळासाहेबांच्या दिघे साहेबांच्या आशीर्वादाने या राज्याचा मुख्यमंत्री झालोय त्यामुळे हक्काचा मुख्यमंत्री तुम्हाला निधी देईन, असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले कल्याण पश्चिम विकासासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांनी अजून काही सुचवले आहे व तसे निवेदन दिले आहे त्यासाठी सुध्दा सरकार सकारात्मक आहे.


No comments:

Post a Comment

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत स्वच्छतेचा बोजवारा..

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे स्वच्छतेचा बोजवारा.. घनकचरा विभागाचे उपायुक्त कोकरे कोकलत आहेत कर्मचारी घरी बसून पगार घेत आहेत.. ...