स्वयंभू श्री सोमेश्वर देवस्थान मासू येथे महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !
_निवोशी / गुहागर: उदय दणदणे_
गुहागर तालुक्यातील मासू येथील स्वयंभू श्री सोमेश्वर देवस्थान मासू येथे शनिवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी महाशिवरात्री उत्सव साजरा केला जाणार आहे. जागृत तसेच अनेकांचे श्रद्धास्थान असलेले स्वयंभू श्री सोमेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ०८ वा. षडोपचारी पूजा, ०९ वा.अभिषेक, ११ वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी.१२-३० वा.आरती, ०१वा. महिला हळदीकुंकू, ०१-३० वा. महाप्रसाद, सायंकाळी- ०६ वा. मंत्रपठण (नामस्मरण), सायंकाळी ०७ वा.महाआरती, ०७-३० वा. नमन तसेच मनोरंजन कार्यक्रम कोकण सह मुबंई रंगमंचावर हाऊसफुल्ल गर्दीत सादरीकरण होणारी कोकणी लोककलांचे एकत्रित धुमशान असलेली नाट्यकृती "कोकणचा साज संगमेश्वरी बाज" या कार्यक्रमाचे रात्रौ-१० वा. आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी दर्शनासह महाप्रसाद तसेच मनोरंजन कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वयंभू श्री सोमेश्वर देवस्थान मासू ग्रामीण/मुबंई कार्यकारणी वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment