Wednesday, 15 February 2023

"वाहतुक व्यवस्थेत बदल बाबत." - नागरीकांनी लक्ष देण्याचे आवाहन

"वाहतुक व्यवस्थेत बदल बाबत." - नागरीकांनी लक्ष देण्याचे आवाहन 

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि, १६ : दि.१७/०२/२०२३ ते दि. २१/०२/२०२३ या दरम्यान महाशिवरात्री निमित्ताने श्री घृष्णेश्वर मंदीर वेरुळ येथे मोठी यात्रा भरत असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून तीन ते चार लाख भाविक दर्शनासाठी येतात. घृष्णेश्वर मंदीर, वेरुळ तसेच तिर्थकुंड व वेरुळ लेणी ही सर्व ठिकाणे धुळे-सोलापुर महामार्ग क्रं ५२ लगत येत असल्याने मोठया प्रमाणावर जड वाहनांची वाहतूक चालू असते व सदरचा रस्ता घाटाचा असल्याने यात्रे दरम्यान वाहनांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

त्याअर्थी मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९४१ चे कलम ३३ (१)(ब), ३४ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारा नुसार सदर यात्रा चालु असे पावेतो खालील प्रमाणे वाहतुकी मध्ये बदल करुन दि.१७/०२/२०२३ रोजी १०.०० वाजे पासुन ते दि. २१/०२/२०२३ चे २४.०० वाजे पर्यंत सर्व प्रकारचे जड वाहने बंद ठेवण्याचे आदेश निर्गमीत करण्यात येत आहे.

नमुद कालावधीत खालील प्रमाणे पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा.

• औरंगाबाद दौलताबाद मार्गे- वेरुळ  कन्नडकडे जाणारी जड वाहतुक      औरंगाबाद दौलताबाद टी. पॉईन्ट (शेरनापुर) कसाबखेडा- वेरुळ मार्गे कन्नडकडे जातील.
• वेरुळ खुलताबाद दौलताबाद मार्गे औरंगाबाद येणारी वाहतुक       वेरुळ कसाबखेडा दौलताबाद टि पॉईन्ट औरंगाबाद जाईल.
• फुलंब्री खुलताबाद- वेरुळ जाणारी जड वाहतुक     फुलंब्री औरंगाबाद नगरनाका दौलताबाद टि पॉईन्ट | कसाबखेडा- वेरुळ मार्गे जड वाहतुक कन्नडकडे जाईल
• वेरुळ खुलताबाद फुलंब्री जाणारी जड वाहतुक     वेरुळ कसाबखेडा दौलताबाद टि पॉईन्ट मार्गे औरंगाबाद अशी जाईल

तरी सर्व वाहन धारकांनी नमुद कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करावा, जेणे करुन वाहतुकीची कुठल्याही प्रकारे कोंडी होणार नाही, वाहतुक नियमाचे पालन करुन पोलीसांना सहकार्य करावे.

No comments:

Post a Comment

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत स्वच्छतेचा बोजवारा..

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे स्वच्छतेचा बोजवारा.. घनकचरा विभागाचे उपायुक्त कोकरे कोकलत आहेत कर्मचारी घरी बसून पगार घेत आहेत.. ...