वालावल येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !
'श्रीमती मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट' वालावल व 'ग्लोबल फाउंडेशन' कुडाळ यांचा पुढाकार ..
मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर )
श्रीमती मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट वालावल व ग्लोबल फाउंडेशन कुडाळ यांचे संयुक्त विद्यमाने वालावल येथे मोफत वैद्यकीय शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन कुडाळ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजयकुमार ओरोसकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराला स्थानिक रहिवाशी यांच्या तर्फे उत्सपूर्त प्रतिसाद मिळाला.
या आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी,दंत तपासणी, रक्तदाब तपासणी, आजाराच्या विविध तपासण्या, रक्ताच्या विविध तपासण्या, करण्यात आल्या.
शिवाय मोफत औषधेही देण्यात आली. हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्याकरिता डॉ. ओंकार वेदक, डॉ. अपूर्वा ठाकूर, डॉ. मिर्नवास परब, डॉ.प्रणव प्रभू यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या आरोग्य शिबिराला ग्रा.पं. वालावलचे ग्रामसेवक सतीश साळगावकर, ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी, सचिव संदीप साळस्कर, ग्लोबल फाउंडेशनचे गुरु देसाई, योगेश गावाडे, ट्रस्टच्या सदस्या सिमा चौधरी, रेश्मा साळसकर, शीतल लाड, चित्रा शेठ आदी मान्यवर उपस्थित होते. शिवाय ग्रामस्थही मोठया संख्येने उपस्थित होते.
श्रीमती मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट वालावल व ग्लोबल फाउंडेशन कुडाळ यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक करत त्यांच्या या कार्यास यनिमित्ताने शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment