Saturday, 11 February 2023

सागर पालवकर लिखित सूर्यकांत पेजे दिग्दर्शित "देहदान" नाट्यकृतीने जिंकली रसिक प्रेक्षकांची मने !

सागर पालवकर लिखित सूर्यकांत पेजे दिग्दर्शित "देहदान" नाट्यकृतीने जिंकली रसिक प्रेक्षकांची मने !

मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर/दीपक कारकर) :

            जो पर्यंत आपण जिवंत आहोत तो पर्यंत आपण आपल्या देहावर अधिकार गाजवतो पण मृत्यूनंतर आपल्या देहाच काय ? हा प्रश्न आपल्याला पडतोच याच उत्तर अचूकपणे देणारे नाटक, अर्थातच लेखक सागर पालवकर यांच्या लेखणीतून आणि दिग्दर्शक सूर्यकांत पेजे यांच्या दिग्दर्शनातून दोन अंकी नाट्यकृती "पंचऋशी सहकार मंडळ" संलग्न पंचऋषी उन्नती मंडळ भातगाव तिसंग ( डिंगणकरवाडी ) ता. गुहागर जि.रत्नागिरी आयोजित शैक्षणिक मदतीकरिता एक सामाजिक व कौटुंबिक नाटक "देहदान" शुक्रवार दि.१० फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रौ ०८:०० वा.छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर दादर (प.) येथे पार पडले. 

रक्त, जात, पात धर्म मानत नाही, खरतर मानवता हाच एकमेव धर्म आहे, तसेच या देहाचे आहे, समुद्राचा किणारा जसा समुद्राची मर्यादा दर्शवतो, तसेच मानवाच्या जिवनात देखील काही घटक आहेत. त्यातील एक घटक म्हणजे आपण देहदान म्हणू या. प्रत्येक माणसाचे जीवन एक कोरं करकरीत पुस्तक त्यातील एखादं पान आपण देहदान करून सार्थकी लावूया, असा अनमोल संदेश देणारी ही नाट्यकृती प्रेक्षकांच्या मनपसंतीस उतरली. 

या नाट्यप्रयोगातील प्रत्येक कलाकाराने जीव ओतून आपली भूमिका यशस्वी केली,त्यातीलच सुनिल डिंगणकर ह्या कलाकाराने सादर केलेल्या "मल्हार" व्यक्तिमत्त्वाच्या भूमिकेला रसिक श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडीत आवाजात प्रोत्साहन दिले.अक्षरशः अश्रू अनावरण करणारी भूमिका सर्वांनाच यादगार राहील.ह्या प्रयोगाला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. आयोजकांतर्फे मान्यवर व कलाकार यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. ह्या स्तुत्य आयोजन व उत्तम सादरीकरणाचे रसिक प्रेक्षकांकडून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...