गरीब - गरजवंताना मिळणार अल्प दरात आरोग्य सुविधा -*जमाते इस्लामी हिंद चा उपक्रम*
*दि . 11 फेब्रुवारी ला राहत क्लिनिक चा शुभारंभ सोहळा*
यवतमाळ/ उमरखेड, अखलाख देशमुख, दि ९ : वाढत्या महागाई च्या काळात महाग झालेल्या आरोग्य व्यवस्थेत गरजवंत गरीब मध्यम वर्गीय कुटुंबांना लहान सहान आजारावर उपचार करने पण कठीण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये सामाजिक एकता व जनसेवे साठी प्रख्यात असलेल्या जमाते इस्लामी हिद या सामाजिक सघटने ने पुढाकार घेवून एक दवाखाना व मेडीकल स्टोअर सुरू करण्याचा संकल्प केला होता. संघटनेतर्फे संचलित राहत बहुउद्देशीय संस्थे अंतर्गत राहत क्लीनिक व मेडीकल स्टोअर चा उद्घाटन सोहळा दि. 11 फेब्रुवारी शनिवारला सकाळी 11 वाजता कुरेशिया कॉम्प्लेक्स नांदेड रोड बजाज शो रूम च्या बाजुला राहत क्लीनिक समोर संपन्न होणार आहे.
20 रुपये तपासणी फी व अत्यल्प दरात औषधी, आयपीडी आणी रक्त तपासण्याची सवलत मिळणार असून दर रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट यात डॉ. अहेसान जुबेरी MS, डॉ. नसरीन जुबेरी MBBS DGO स्त्रीरोग तज्ञ, डॉ. एस पी डोंगे छाती रोग तज्ञ तसेच विविध आजारांवरील तज्ञ सेवा देणार आहेत.
दवाखान्यात वैघकीय मार्गदर्शन केंद्र, क्षय रोग केंद्र, शहरात म. फुले योजने मध्ये हाडांचे शस्त्रक्रिया, सरकारी योजनांची माहिती या मार्गदर्शन केंद्राद्वारे देण्यात येणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन क्लीनिकचे सचिव शेख आसिफ यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अ.नईम सचिव हेल्थ व मेडीकल गायडन्स डिपार्टमेन्ट मुंबई महाराष्ट्र, अकील मिर्झा सचिव विस्तार विभाग, जमातचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष शेख नईम उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात वैधकिय क्षेत्रात समाज सेवक म्हणून उत्तम कामगीरी करणारे औरंगाबादचे तौसीफ खान, नांदेडचे अब्दुल हकीम, पुसदचे अब्दुल मुदस्सीर, आयडीयल रिलीफ कमेटी ट्रस्ट मुंबईचे अ. नईम याचा या प्रसंगी सत्कार करण्यात येणार आहे .
या जनहितासाठी सुरू करण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात सर्व सामाजिक संघटना, प्रतिष्ठीत नागररिक, राजकीय कार्यकर्ते, पत्रकार बांधव आणी समाजातील सर्व नागरिक महीला - पुरुषांनी उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन जमातचे अध्यक्ष काझी जहीरोद्दीन यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे .
No comments:
Post a Comment