युनानी दिनानिमित्त औषधी प्रदर्शनाचे महापौरांचे हस्ते उद्घाटन !
जळगाव, अखलाख देशमुख, दि ९ : युनानी दिनानिमित्त इकरा युनानी मेडिकल कॉलेजतर्फे आयोजित करण्यात आलेल्या घरगुती औषधी प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार, दि.9 फेब्रुवारी 2023 रोजी शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या संचालिका तसेच जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आले.
याप्रसंगी करीम सालार, एजाज मलिक, डॉ.मोहम्मद इस्लाही, डॉ.इकबाल शाह, अमीन बादलीवाला,मुफ्ती हारून, डॉ.अमानूल्ला शाह, ऍड.माजिद झाकरिया, रशीद शेख,अजीज सालार, डॉ.मोहंमद अली इस्लाही तसेच प्राचार्य डॉ.अब्दुल कुद्दुस आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांना युनानी दिनाच्या शुभेच्छा देत महापौरांनी घरगुती औषध आजाराच्या उपचारासाठी एक चांगला उपाय असल्याचे सांगून या प्रदर्शनातून सर्वाना चांगली उपयुक्त माहिती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
No comments:
Post a Comment