Tuesday, 7 February 2023

पाचोरा-जामनेर नॅरोगेज लाईन पहुर पर्यंत वाढविण्याची खासदार रक्षाताई खडसे यांनी लोकसभेत मागणी !

पाचोरा-जामनेर नॅरोगेज लाईन पहुर पर्यंत वाढविण्याची खासदार रक्षाताई खडसे यांनी लोकसभेत मागणी !

जळगाव, अखलाख देशमुख, दि ८ : अजिंठा लेणी पर्यटनासाठी पाचोरा-जामनेर नॅरोगेज लाईन पहुर पर्यंत वाढवून बोदवड स्टेशनला जोडण्याची; खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी लोकसभेत मागणी केली 

रेल्वे मंत्रालयास अर्थसंकल्प २०१९-२० मध्ये पाचोरा-जामनेर नॅरोगेज लाईन ब्रॉडगेज रूपांतर व बोदवड स्टेशन पर्यंत वाढीसाठी मंजुरी मिळाली असून, कोविड काळात सदर पाचोरा-जामनेर नॅरोगेज रेल्वे बंद करण्यात आली होती. आजपावेतो सदर लाईन बंद असून, आता नॅरोगेज लाईन ब्रॉडगेज रूपांतर प्रगतीपथावर असून पीजे रेल्वे लाईन सुरू करणे, तसेच जागतिक पर्यटन केंद्र "अजिंठा लेणी" साठी पहुर गावपर्यंत १२ किमी नवीन प्रत्यक्ष ब्रॉडगेज लाईन टाकून बोदवड स्टेशन पर्यन्त जोडण्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी लोकसभेच्या माध्यमातून रेल्वे मंत्री यांना केली.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...