Thursday, 23 February 2023

प्रदिप वाघ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन !

प्रदिप वाघ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन !

जव्हार,:जितेंद्र मोरघा :

मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथे प्रदीप माधव वाघ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अमोल पाटील तालुका प्रमुख शिवसेना तथा नगराध्यक्ष मोखाडा यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलतान अमोल पाटील यांनी सांगितले की खोडाळा परीसरातील व तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी या जनसंपर्क कार्यालयातुन नक्कीच प्रयत्न केला जाईल व प्रदीप वाघ हे सातत्याने सामान्य माणसाची गरज लक्षात घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे कार्यालय निर्माण केले आहे त्यामुळे नक्कीच लोकांच्या अडचणी दूर होतील अशी अपेक्षा अमोल पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी प्रल्हाद काका कदम यांनी देखील शुभेच्छा दिल्या.
पत्रकार हनिफ भाई शेख यांनी सांगितले की पत्रकारांना देखील हक्काची जागा उपलब्ध झाली असून प्रदीप वाघ हेच एक फिरत कार्यालय आहे.आणि कार्यालया मुळे त्यांना अधिक कामे करता येतील.

झाप सरपंच  एकनाथ दरोडा यांनी सांगितले की मी  प्रदिप वाघ  हे कुठलाही भेद भाव करत नाहीत त्यामुळे या ठिकाणी सर्व नागरिकांची सोय झाली आहे.

आभार मानताना  प्रदीप वाघ यांनी सांगितले की जात पात, धर्म, पक्ष या पलीकडे जाऊन हे कार्यालय निर्माण केले असून याठिकाणी सर्व नागरिकांनी समस्या घेऊन या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.
यावेळी सर्व पक्षातील राजकीय मान्यवर, परीसरातील सामाजिक कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, सदस्य, आदिवासी समाजातील पदाधिकारी खोडाळा गावातील व्यापारी, अधिकारी, कर्मचारी व प्रदीप वाघ यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भरत गारे यांनी केले.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...